लूटमार प्रकरणी दोघा संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लूटमार प्रकरणी दोघा संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध

तासगाव - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या २५ लाखांच्या लूटमार प्रकरणी आज दिवसभर पोलिस चक्रे जोरात फिरत होती. ठिकठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. 

लूटमार प्रकरणी दोघा संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तासगाव - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या २५ लाखांच्या लूटमार प्रकरणी आज दिवसभर पोलिस चक्रे जोरात फिरत होती. ठिकठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. 

तासगाव-विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य शाखेतून विसापूर शाखेत नेण्यात येणारी २५ लाखांची रोकड काल अज्ञात चोरट्यांनी लुटून नेली होती.

दोन मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पैसे लंपास केले होते. भरदिवसा अशाप्रकारे लूटमार झाल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. कालपासून पोलिसांनी विविधांगांनी तपास सुरू केला आहे. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वर्णनावरून संशयितांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत.

रेखाचित्रांच्या आधारे यापूर्वी अशाप्रकारे गुन्हे केलेल्या संशयितांच्याकडे तपास करण्यात येत आहे. लूटमार झालेल्या ठिकाणवरून झालेल्या मोबाईल फोनची चौकशी करण्यात येत आहे. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. 

उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर पोलिस निरीक्षक राजेंद्र सावींत्रे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी धावपळ करताना दिसत होते. ढवळी रस्त्यावरून संशयित मोटारसायकल गेल्याच्या माहितीवरून त्या परिसरात पोलिसांनी चौकशी केली.

loading image
go to top