ST Bus Crashes : बस चालवत पाणी पीत होता, ताबा सुटला अन् एसटी थेट झाडावर आदळली 25 प्रवासी जखमी
Bus Accident : बसमधील प्रवासी घाबरून गेले होते. अपघातानंतर बस एका बाजूला कलली होती. समोरील झाडाला धडक झाल्यामुळे बस पूर्णपणे उलटली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
Sangli Bus Accident : चालू बसमध्ये पाणी पित असताना एसटी चालकाचा ताबा सुटल्याने आज दुपारी वाघवाडीजवळ मोठा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अंदाजे २० ते २५ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.