
मंगळवेढा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (इयत्ता दहावी) तालुक्याचा निकाल 93.53 टक्के इतका लागला असून, बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील घट झाली असून गतवर्षी दहावीच्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात पाच टक्क्यांनी घटला. इंग्लिश स्कूलची आश्लेषा शिवाजी भोसले 98.20% गुण घेऊन तालुक्यात पहिली आली.