Miraj : बेळंकीत कडब्यात लपवलेला दोन किलो गांजा जप्त; मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई
Sangli News : संशयित मोरे याने आरग रस्त्यावरील माने मळा येथील शेतातील कडब्याच्या गंजीत हा गांजा लपवून ठेवला होता. हा गांजा विक्री करण्याच्या हेतूने त्याने आणला होता.
Miraj rural police seized 2 kg of ganja concealedSakal
मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे कडब्याच्या गंजीत लपवून ठेवलेला ५१ हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. संभाजी बाबासाहेब मोरे (माने मळा, बेळंकी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.