कोपरगावच्या महिलेची औषधे अडकली पोस्टात... थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हलवली सूत्रे

The drug is stuck in the post ... directly taken by the central health ministry
The drug is stuck in the post ... directly taken by the central health ministry
Updated on

कोपरगाव ः ती महिला साधक तालुक्यतील ग्रामीण भागातील महानुभाव आश्रमात रहाते. दिल्ली येथून  पोस्टाने पाठवलेले औषधे लोकडाऊनमुळे  कुठे अडकले समजेना. केंद्रीय आरोग्य विभाग, दिल्लीचे बीजेपी मुख्यालय ते थेट राज्य सरकार व पुन्हा कोपरगाव तालुक्यतील संवत्सर गावापर्यंत सूत्रे हलली. अखेर पोस्ट विभागात अडकलेले ते औषधांचे पार्सल संवत्सर येथील महानुभाव आश्रमातील सेवेकरी प्रेरणा महानुभाव (50 रा. दिल्ली) यांच्या हातात पडले.

पोस्ट निरीक्षक विनायक देशमुख, पोस्ट मास्तर दत्तात्रेय गायकवाड यांनी काल सायंकाळी हे औषध सुपूर्त केले. यावर केंद्रीय मंत्री रवीप्रसाद  शंकर यांनी ट्विट करीत लोकडाऊनच्या काळात पोस्ट विभागाने रुग्णला औषधी पोहच केल्याचा मनस्वी आनंद झाला. भावना व्यक्त करीत अभिनंदन केले आहे. त्यामुळे प्रेरणा महानुभाव या चर्चेत आल्या आहेत.

याबाबतची अधिक महिती अशी, तालुक्यातील संवत्सर येथील महानुभाव आश्रमात प्रेरणा सेवा देत आहे. त्यांच्या औषधांचे पार्सल 17 मार्च रोजी दिल्ली येथून पोस्टात दिले. मात्र ते नेमके कुठे अडकले ते लोकडाऊन मुळे समजून आले नाही. त्यासाठी प्रेरणा यांनी दिल्ली येथील त्यांचे भाऊ भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह विभागातील कर्मचारी यांच्याशी संपर्क व ट्विट करीत पार्सल संबंधी काही करता येईल का याची विचारणा केली. नगरचे जिल्हाधिकारी, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधला.

दरम्यान महाराष्ट्र  शिवसेनेचे रमेश सोळंकी, देवांग दवे आदींनी प्रयत्न केले. सर्व बाजूने सूत्रे हलली. पुणे येथून स्वतंत्र गाडीने सदर पार्सल काल सायंकाळी कोपरगाव येथे आले सायंकाळी उशिरा पोस्ट विभागचे निरीक्षक विनायक शिंदे, संवत्सर पोस्ट मास्तर दत्तात्रेय गायकवाड मेल ओव्हर सिव्हर अर्जुन मोरे यांनी डिलिव्हरी केली. पार्सल मिळाल्याने व औषधे मिळाल्याने प्रेरणा यांनी देखील आनंद व्यक्त करीत सर्वचे आभार मानले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com