
विटा : येथे दारूच्या नशेत चारचाकी चालविणाऱ्या चालकाला विटा न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज बारा हजार रुपयांचा दंड ठोठावला. गणेश दादासो कुंवर (वय २५, बाभूळगाव, ता. येवला) असे चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस विक्रम गायकवाड यांनी चालक कुवर याच्याविरुध्द विटा न्यायालयात दावा दाखल केला.