या कारणामुळे नगरचे मार्केट राहिले बंद

Due to this, the market in Ahmednagar remained closed
Due to this, the market in Ahmednagar remained closed

नगर तालुका ः जिल्हा प्रशासनाने व दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीने माल घेऊन येणाऱ्या वाहनांत केवळ दोन जण ठेवण्याची परवानगी दिली आहे. तरीही चिंच घेऊन आलेल्या मालट्रकमध्ये 10 ते 15 ग्राहक आल्याने हमालांनी माल उतरविण्यास नकार दिला. त्यामुळे आज बाजार समितीतील चिंचेचे मार्केट बंद होते. 
जिल्हा प्रशासनाने कृषीसंदर्भातील सर्व दुकाने व बाजार खुले करण्याच्या सूचना काल दिल्या होत्या. त्यानुसार आज पहाटेच बाजार समितीत वर्दळ सुरू झाली. चिंचेच्या अडतीवर काही ट्रक आले. प्रत्येक ट्रकवर 10 ते 15 ग्राहक असल्याचे हमालांच्या लक्षात आले. त्यामुळे हमालांनी माल उतरविण्यास आणि चिंच अडतीत काम करण्यास नकार दिला. व्यापाऱ्यांनीही चिंचेची आडत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिंच मार्केट केवळ तासभरच खुले होते. 

बाजार समितीत आज वीजपंप व पाइपची दुकाने, बी-बियाणे, तसेच खतांची दुकाने, धान्याच्या अडती, गूळ अडत आदी दुकाने उघडली. मात्र, या दुकानांत ग्राहकांची संख्या कमी होती. या दुकानांत आज माल मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आला. पोलिस प्रशासन नागरिकांची वाहने जप्त करीत असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीत जाणे टाळले. त्यामुळे बाजारात ग्राहकांची वानवा होती. दुपारनंतर अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांअभावी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. भुसार खरेदीही 50 टक्‍के कमी झाली आहे. 

पोलिस प्रशासन वाहने जप्त करीत असल्याने शेतकरी बी-बियाणे व खतांच्या खरेदीस येणे टाळत आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना कृषीविषयक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट दिलेली असताना पोलिस प्रशासनाने शेतकऱ्यांची कोणतीही वाहने अडवू नयेत. 
- अजय बोरा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‌स, सीड्‌स डीलर्स असोसिएशन 

ग्राहक व व्यापाऱ्यांना पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे. ग्राहक भयभीत असल्याने बाजारपेठेकडे वळत नाहीत. त्यामुळे 12 वाजेपर्यंत मार्केट उरकून जाते. 
- मयूर खेंडके, व्यापारी 

शासनाच्या नियमानुसार नेप्तीला भाजीपाला, तर दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषीविषयक साहित्याची विक्री सुरू आहे. भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिस चुकीच्या पद्धतीने वागणूक देत आहेत. शेतकऱ्यांची शहानिशा करूनच पोलिसांनी कारवाई करावी. 
- संतोष म्हस्के, उपसभापती, दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com