सांगलीतील फुंसुक वांगडुने बनवला सॅनिटायझर फवारणार रोबोट

तानाजी टकले
Monday, 31 August 2020

वस्तूला हाताचा कमीत कमी स्पर्श होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर सुरु आहे.

आष्टा : आष्टातील महात्मा गांधी विद्यालयात सातवीत शिकणाऱ्या प्रज्वल संदीप माळी या विद्यार्थ्याने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटायझर फवारणी करणारा रोबोट बनवला आहे. माणसांकडून होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु असताना त्याने फवारणी करणाऱ्या रोबोटची निर्मिती करुन प्रयोगशीलता दाखवली आहे. लॉकडाउनमध्ये काय करायचे, असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर त्याने आदर्श उभा केला आहे. 

हेही वाचा -  कोरोनाच्या भीतीपोटी  व्हिटॅमिन, मल्टीव्हिटॅमिनला चौपट मागणी ...

कोरोनामुळे हस्तांदोलनाला बहुतांश जणांनी रामराम ठोकला आहे. वस्तूला हाताचा कमीत कमी स्पर्श होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर सुरु आहे. कोरोना विषाणू अतिसूक्ष्म असल्याने त्याचा फैलाव झालेलाही कळत नसल्याने काळजी घेतली जात आहे. कोरोना रुग्णांसाठी मिरजेतील कोविड हॉस्पिटलमध्ये रोबोट कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील लोकांना बाहेरून आल्यानंतर जंतूसंसर्ग टाळण्यासाठी काळजी घेतली जात आहे. रोबोटकडून सॅनिटायजर फवारणी केल्यास धोका कमी राहतो, या उद्देशाने त्याने हा रोबोट तयार केला आहे. 

हेही वाचा -  video : त्याला काय हुतंय...  लेकीच्या गावाला जायच तर एसटीनेच...

आता प्रज्वलने सुरक्षितता म्हणून सॅनिटायजर फवारणी करणारा रोबोट बनवला आहे. त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक होत आहे. नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी नगरसेवक सतीश माळी, नगरसेविका पुष्पलता माळी, पंडित माळी, रमेश माळी, भारतीय विद्यानिकेतन शाळेच्या अर्चना गुरव,वैशाली कुरणे, अर्चना भानुसे, अस्मिता डिग्रजे यांनी सत्कार करुन कौतुक केले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: during lockdown period 7th standard boy prepare a robot who spray sanitizer