
सांगली : ‘‘राज्य शासनाच्या गोहत्या बंदी कायद्याचे तंतोतंत पालन करावे. गोसेवकांना यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कोणतीही कार्यवाही न करता त्याची कल्पना पोलिसांना द्यावी,’’ असे आवाहन पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले. बकरी ईदनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.