निपाणीत आजपासून घरबसल्या मिळणार मतदार ओळखपत्र

E Epic Card campaign in Nipani from today
E Epic Card campaign in Nipani from today
Updated on

निपाणी - मतदार ओळखपत्र आता डिजीटल झाले असून निपाणी तालुक्‍यातील सुमारे तीनशे जणांना निवडणूक आयोगाकडून ई-ईपिक (इलेक्‍टर्स फोटो आयडेंटीटी कार्ड) ओळखपत्राचे ऍप डाऊनलोड करून मिळणार आहे. 2020 मध्ये ज्यांनी पहिल्यांदाच 6 नंबर अर्ज भरून त्याव्दारे मतदार यादीत नाव नोंदणी केली, व ज्यांनी युनिक मोबाईल क्रमांक दिला आहे, अशा मतदारांचाच त्यात समावेश आहे. उद्या शनिवार (ता. 6) व रविवारी (ता. 7) या दोन दिवशी हे ऍप निपाणी तालुक्‍यात डाऊनलोड करून देण्याचे कामकाज चालणार आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी तसे आदेश दिले आहेत.

ई-ईपिक ऍपच्या माध्यमातून मतदार ओळखपत्र देण्याचे काम तालुक्‍यात पहिल्यांदाच होत आहे. ऍपमुळे घरी बसूनच मतदारांना ओळखपत्र मिळणार आहे. ऍपच्या माध्यमातून निर्माण झालेल्या कार्डची प्रिंट काढता येऊ शकते, अथवा मोबाईलमध्ये हे कार्ड संग्राह्य ठेवता येणार आहे. अशा मतदारांनी आपल्या प्रभागातील मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी (बीएलओ) संपर्क साधावा लागणार आहे. बीएलओंच्या मदतीने ऍप डाऊनलोड करता येणार आहे. यावेळी मोबाईल अथवा संगणकावर मतदार कार्ड काढता येईल. 
 
ई-एपीक ओळखपत्र कसे करता येईल 
http://voterportal.eci.gov.in किंवा http://nvsp.in या संकेत स्थळाला भेट द्या. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. जर तुमचे अकाऊंट नसेल तर मोबाईलच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरु करु शकता. वेबसाईटवर लाग इन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्‍लिक करा. शनिवार (ता. 6) व रविवारी (ता. 7) ऍपडाऊनलोड करता येणार आहे. 
 
"शनिवार (ता. 6) व रविवारी (ता. 7) ई-ईपिकसाठी ऍप डाऊनलोड प्रक्रिया चालणार आहे. 2020 मध्ये ज्यांनी नवीन नोंदणी केली आहे व ज्यांनी युनिक मोबाईल क्रमांक दिला अशांच्या मोबाईलवर ऍप डाऊनलोड होईल. ऍपच्या माध्यमातून एपिक मतदार ओळखपत्र मिळू शकेल. सध्यातरी केवळ 300 मतदारांबद्दल निर्देश आले आहेत. अन्य मतदारांबद्दल येत्या काळात आदेश येतील."

-अभिषेक बोंगाळे, अधिकारी, निवडणूक विभाग-निपाणी  
 

  संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com