अथणी तालुक्यातील शिरहट्टीला भुकंपाचे धक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake Shirhatti in Athani taluka walls Break of 11 houses

अथणी तालुक्यातील शिरहट्टीला भुकंपाचे धक्के

अथणी : शिरहट्टी (ता. अथणी) येथे शनिवारी (ता. ९) सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान भुकंपाचे तीन धक्के बसले. त्यामुळे गावातील महावीरनगर येथील 11 घरांच्या भिंतींना तडे गेले आहे. भुकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थ सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या घरातील कामे करत होते. यावेळी अचानक साडेसहा ते सातच्या दरम्यान भुकंपाचा धक्का बसून जमीन थरथर कापू लागली. त्यामुळे घरातील लोक सगळेच बाहेर आले. त्यांना भिंतीला तडे गेलेले दिसून आले.

तसेच घरातील भांडी खाली पडली. लोक घराच्या बाहेर आले असता भिंत पुन्हा गडगडू लागली. याविषयी बाहेर चर्चा करताना पुन्हा धक्के बसून भिंतीला तडे गेले. तातडीने घटनास्थळी अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, तहसीलदार सुरेश मुंजे यांनी भेट देऊन पाहणी केली. गावातील लोकांना त्यांनी धीर दिला. भूकंप झाल्याचे समजताच गावातील लोकांची गर्दी झाली. शिरहट्टी गावाला हा भूकंपाचा पहिलाच धक्का आहे. या भूकंपामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली असून सर्व भागातून विचारना होत आहे.

Web Title: Earthquake Shirhatti In Athani Taluka Walls Break Of 11 Houses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..