"क्रीडा'च्या खेळामध्ये कारवाई रखडली 

Education department action breaks due to sports department
Education department action breaks due to sports department
Updated on: 

नगर : क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील सुमारे 252 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतलेला नाही. याबाबत "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने "त्या' शाळांची यादी क्रीडा विभागाकडे दाखल केली होती. मात्र, अद्याप क्रीडा विभागाकडून यादी न दिल्याने संबंधित शाळांवरील कारवाई रखडलेली आहे. 

"जिल्ह्यातील अडीचशे शाळांना खेळाचे वावडे' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी संबंधित शाळांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातून झाली होती. याच मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेमध्ये दोन वेळेस चर्चा झाली होती. या चर्चेत क्रीडा विभागाकडून यादी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांनी सभागृहाला दिली होती.

शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न झालेल्या शाळांची यादी क्रीडा विभागाने द्यावी, यासाठी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप ही यादी न आल्याने शाळांवरील कारवाई रखडलेली आहे. 

जिल्ह्यातील शाळांचा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग कमी असल्याचे दिसून येताच क्रीडा विभागाने याची दखल घेऊन त्या शाळांची यादी तयार करून शिक्षण विभागाला सादर करणे गरजेचे असताना त्यांच्याकडून मात्र तशी काहीच हालचाल झालेली नाही. शिक्षण विभागच ती यादी द्या, म्हणून क्रीडा विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. 

क्रीडा विभागाला यादी द्यायला अडचण काय? 
जिल्ह्यातील सुमारे अडीचशे शाळांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. या संदर्भातील यादी द्यायला क्रीडा विभागाकडून नेमका का उशीर होत आहे, असा मुद्दा या निमित्ताने आता पुढे आला आहे. 

पाठपुरावा सुरु ः थाेरे

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न झालेल्या शाळांची यादी क्रीडा विभागाने द्यावी, यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच त्यांच्याकडे यादीसाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्याकडून यादी आल्यानंतर संबंधित शाळांना नोटीस बजाविण्यात येईल. 
- दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Sugarcane Price Protest
Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Marathi News Esakal
www.esakal.com