पालक व विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे शिक्षण खाते नरमले; परीक्षा पुढे ढकलली | HSC Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Exam

पालक व विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे शिक्षण खाते नरमले; परीक्षा पुढे ढकलली

बेळगाव - बारावीची सहामाही परीक्षा वार्षिक परीक्षेप्रमाणे घेण्यास पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने बारावीची सहामाही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 9 डिसेंबरपासून परीक्षेला सुरवात होणार आहे.

यावेळी पहिल्यांदाच बारावीची सहामाही परीक्षा वेगळ्या पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावेळी परीक्षेवेळी परीक्षा महामंडळाकडून प्रश्न पत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच कोरोना मुळे पुन्हा बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला तर सहामाही परीक्षेतील गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच बोर्डाकडून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थी व पालकांनी विरोध करीत बोर्डाकडून परीक्षा देण्यास तीव्र विरोध केला होता. तसेच पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या कार्यालया समोरही मी काय सांगतो आंदोलन छेडण्यात आले होते. याची दखल घेत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र परीक्षा बोर्डाकडून घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे परीक्षा द्यावी लागणार आहे.

हेही वाचा: टीईटी, नेट परीक्षा आता एकाच दिवशी : तारखांचा गोंधळ संपणार कधी?

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 23 ऑगस्टपासून अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थीही मोठ्या संख्येने महाविद्यालयात दाखल होत असून हळूहळू शैक्षणिक वर्ष पूर्वपदावर येत आहे. त्यानंतर पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत 29 नोव्हेंबरपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिक्षण खात्याने सहामाही परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेत प्रॅक्टिकलचे विषय 70 गुणांचे तर गणित, इंग्रजी व इतर विषयांचे पेपर 100 गुणांचे घेतले जाणार आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षे परीक्षा नसताना विद्यार्थ्यांना पास करण्याची वेळ आली होती. त्यामुळे बारावीची सहामाही परीक्षा वार्षिक परीक्षेप्रणाणे घेतली जाणार आहे. मात्र परीक्षेची तारीख पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे याचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घेत चांगल्या प्रकारे परीक्षा देण्यासाठी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

loading image
go to top