esakal | कर्नाटकात 'या' ऍप वर आहेत आठ भाषांतील एक लाख पुस्तके उपलब्ध 
sakal

बोलून बातमी शोधा

effect of the e-library One lakh books available in eight languages in belgaum

ऑनलाईन वाचनाकडे वाढता कल 

कर्नाटकात 'या' ऍप वर आहेत आठ भाषांतील एक लाख पुस्तके उपलब्ध 

sakal_logo
By
महेश काशीद

बेळगाव : कोरोनामुळे वाचकांची सुरक्षितता लक्षात घेऊन राज्यात सार्वजनिक वाचनालये अद्याप सुरु झालेली नाहीत. यामुळे ई-लायब्ररीला मागणी वाढली असून ऑनलाईन वाचनाकडे कल वाढत आहे. पाच महिन्यात सुमारे 13 लाख वाचक वाढले आहेत. दरम्यान, ऑनलाईन लायब्ररीत आठ भाषांतील एक लाख पुस्तके आहेत. त्यात मराठीतील 42 पुस्तके असून सर्वाधिक 89 हजार इंग्रजी पुस्तके आहेत. 


कोरोनामुळे सर्वच ठिकाणची वाचनालये बंद आहेत. पण, वाचकांना ऑनलाईन पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यासाठी राज्यातील 273 वाचनालयांचे डिजिटलीकरण केले आहे. फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत कर्नाटकच्या डिजिटल लायब्ररीला भेट देणाऱ्यांचा आकडा वाढलेला आहे. "कर्नाटक डिजिटल पब्लिक लायब्ररी आणि ई-सार्वजनिक ग्रंथालय' नावाने ऍप विकसीत केले आहे. या ऍपद्वारे आतापर्यंत 4 लाख 6 हजार जणांनी नोंदणी (लॉगीन) केले आहे. येथे सर्व भाषेत विविध प्रकारची ऑनलाईन पुस्तके, ग्रंथ व कांदबऱ्या उपलब्ध आहेत. याठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक पुस्तकेही आहेत. 

हेही वाचा- दवाखान्याचे ठोठावले दरवाजे कोणीच केला नाही उपचार  ; शेवटी शेतकऱ्याला हाय खातच गमवावे लागले प्राण -


ऑनलाईन वाचकांमध्ये बंगळूर अग्रस्थानी आहे. यापाठोपाठ रायचूर, यादगिरी, बागलकोट व रामनगरचा क्रमांक आहे. त्यानंतर बेळगावचा क्रमांक आहे. माहितीचा अभाव आणि कोरोनामुळे या अद्ययावत सेवेची जागृती झाली नसल्याने बेळगाव मागे आहे. पण, गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातही ऑनलॉईन वाचकांचा आकडा वाढतोय, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

हेही वाचा-मित्रांची मिळाली साथ अन् विकी-मोहित जोडीने गीतांना दिला ‘बेधुंद’ संगीतसाज

राज्यातील डिजिटल वाचनालये 
जिल्हा वाचनालय  : 30 (सर्व जिल्हे) 
नगर वाचनालय :  27 
तालुका वाचनालय : 215 

भाषावार पुस्तके 
इंग्रजी : 89,654 
मराठी : 42 
हिंदी, संस्कृत : 454 
कन्नड : 4,709 
तमिळ : 118 
तेलगू : 101 

हेही वाचा-शववाहिका मिळण्यासाठी वेटिंग ; अखेर मृतदेह नेला जीपमधून

वाचकांचा कल लक्षात घेऊन वाचनालयांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. यामुळे वाचक ऑनलाईन आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातून नोंदणी करून वाचनाचा आनंद घेत आहेत. 
- डॉ. सतीश होसमनी, संचालक, ग्रंथालय विभाग


संपादन - अर्चना बनगे