लवकरच थांबेल पुण्या-मुंबईची "वारी' 

Efforts for mirajgav trauma center begin
Efforts for mirajgav trauma center begin

कर्जत : कर्जत - जामखेडमध्ये आरोग्य सुविधेचा प्रश्न बिकट आहे. तत्काळ उपचाराअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे मतदारसंघातील आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करीत आमदार रोहित पवार यांनी सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या ट्रॉमा सेंटरसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मिरजगाव परिसरात ते उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांची पुण्या-मुंबईची वारी थांबण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

आमदार पवार यांनी नुकतीच नागपूर येथील गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कामकाज व आरोग्य सुविधांबाबत माहिती घेतली. आशिया खंडातील सर्वांत मोठे, 196 एकर क्षेत्रावर हे हॉस्पिटल आहे. तेथे कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात, तेथील कामाची पद्धत काय आहे आणि याच अनुषंगानेकर्जत-जामखेड मतदारसंघात आरोग्याबाबत कोणत्या सुविधांची अंमलबजावणी करू शकतो, याबाबत माहिती घेतली. या वेळी या कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. एम. डी. फैसल, डॉ. अविनाश गावंडे आदींनी या ट्रॉमा सेंटरबद्दल माहिती दिली. 

येथे क्‍लिक करा बिबट्या पडला विहिरीत 

एकाच वेळी अनेक जखमींना किंवा रुग्णांवर आपत्कालीन उपचारासाठी सिटी स्कॅन, एमआरआय, आयसीयू, सर्जरी, असे प्रमुख विभाग या ट्रॉमा सेंटरमध्ये उपलब्ध असतात. त्यासाठी 
तेथे असणारे तज्ज्ञ डॉक्‍टर, न्यूरो सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन या विभागात तैनात असतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास अतिदक्षता विभाग सज्ज असतो. 

कर्जत- जामखेड तालुक्‍यांतील अनेक राज्यमार्ग व राष्ट्रीय मार्ग जातात. त्या रस्त्यांवर अनेक ठिकाणे अपघातप्रवण आहेत. मतदारसंघात ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बारामती, पुणे, नगर आदी ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. आमदार पवार यांच्या प्रयत्नातून लवकरच आरोग्य सुविधेचा प्रश्न सुटणार आहे. 

कर्जत-जामखेडमध्ये अत्याधुनिक सुविधा देणार 
आदरणीय शरद पवार यांच्या विचारांचा वसा आणि वारसा यावर मार्गक्रमण सुरू आहे. त्यातूनच विधायक काम सुरू आहे. कर्जत-जामखेडमध्ये अत्याधुनिक सुविधा नाहीत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. यापुढे तसे होणार नाही. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. 
- आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com