esakal | Belgaum : माध्यान्ह आहारासोबत मिळणार अंडी
sakal

बोलून बातमी शोधा

mid day meal

माध्यान्ह आहारासोबत मिळणार अंडी

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : कुपोषण दूर करण्यासाठी राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराबरोबर अंडी देण्याची योजना सरकार हाती घेणार आहे. लवकरच सरकारी व अनुदानित शाळांत ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. सुरवातीला कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या सात जिल्ह्यात ही योजना लागू होणार आहे. या जिल्ह्यांतील १४ लाख विद्यार्थ्यांना अंडी वितरणाचा लाभ मिळणार आहे. काही महिन्यांत योजनेचा विस्तार राज्यभर करण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराबरोबर अंडी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यातील जैन समाजाने या निर्णयाला विरोध केला होता. तसेच कागवाडमध्ये जैन समाजाने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. त्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाल्यामुळे अंडी वितरणाचा निर्णय मागे घेण्यात आला होता.

गेल्या काही महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात कल्याण कर्नाटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील काही जिल्ह्यांमध्ये आणि विजापूर जिल्ह्यात कुपोषित मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराबरोबरच अंडी वितरण केले जाणार आहे. याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सुरुवातीला फक्त माध्यान्ह आहार दिला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आहाराबरोबरच क्षीरभाग्य योजनेंतर्गत आठवड्यातून दोनवेळा दुधाचे वितरण केले जात आहे. त्याचाही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.

loading image
go to top