निपाणी : गजबरवाडी-कसबा सांगाव नदीत आठ फुटी मगर

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : परिसरात ३ मगरींचा वावर
गजबरवाडी-कसबा सांगाव नदी परिसरात वावरणारी आठ फुटी मगर
गजबरवाडी-कसबा सांगाव नदी परिसरात वावरणारी आठ फुटी मगरsakal

निपाणी : महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे वेदगंगा आणि दुधगंगा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. शिवाय अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यापासून नदीचे पाणी खालावत असून गजबरवाडी-कसबा सांगाव नदी परिसरात मगरींचा वावर वाढल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. या परिसरात गेल्या दोन दिवसापासून ३ मगरींचा वावर सुरू असून त्यापैकी तब्बल आठ फूट मगर नदीच्या काठावर वारंवार येत असल्याने महिला आणि शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गजबरवाडी परिसरातील डोणे, केनवडे मळ्यातील अनेक महिला दररोज धुणे धुण्यासाठी या नदीपात्रात जातात. पण आता त्या परिसरात मगरीचा वावर वाढल्याने महिलांमधून भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन खात्याने या परिसराकडे लक्ष देऊन मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात भोज, बारवाड, कुन्नूर, गजबरवाडी, मांगूर, जत्राट परिसरात अनेक लहान-मोठ्या मगरी आढळून येत आहेत. त्यामुळे शेतकरी व वन खात्याच्या संयुक्त कारवाईमुळे या मगरी पकडून वनखात्याच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. यंदाही या परिसरात मगरीचा वावर सातत्याने वाढला आहे. त्यामुळे नदीकाठचे गवत कापण्यासह पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री-अपरात्री तरी काठावर विद्युत मोटारी व सुरू करण्यासाठी जातात.

गजबरवाडी-कसबा सांगाव नदी परिसरात वावरणारी आठ फुटी मगर
अमरावती : पालकमंत्र्यांनी घेतली सेजलच्या बहीण, भावाच्या शिक्षणाची जबाबदारी

पण अचानक त्या मगरींचा शेतकऱ्यावर हल्ला झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून या मगरीची माहिती काही शेतकऱ्यांनी वन खात्याला दिली आहे. पण आजतागायत याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नदीकाठावर विद्युत मोटारी सुरु करण्यासह गवत कापण्यासाठी जाताना शेतकरी धास्तावले आहेत. पाच ते नऊ फुटापर्यंत या मगरी असून त्यामुळे शेतकऱ्यांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी वनखात्याने त्याची गंभीर दखल घेऊन मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मगरी लोकवस्तीत जाण्याची भीती

कुन्नूर, गजबरवाडी, कसबा सांगाव, भोज परिसरात दुधगंगा नदीत रात्रभर या मगरीचा वावर असतो. पण दिवसा या मगरी गवत गड्यासह शेतीवाडीत जात आहेत. परिसरात असलेल्या लोकवस्तीत मगरी जाण्याची शक्यता असल्याने जनावरांसह वाडी-वस्ती येथील नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com