शिराळा तालुक्‍यात आठ रुग्ण 

शिवाजी चौगुले
Friday, 17 July 2020

शिराळा तालुक्‍यातील गुढे पैकी बांबरवाडीत पती पत्नी असे2, येळापूर चार, गवळेवाडी व मांगरूळ येथे प्रत्येकी 1असे एकूण तालुक्‍यातील चार गावात 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

शिराळा (जि. सांगली) : शिराळा तालुक्‍यातील गुढे पैकी बांबरवाडीत पती पत्नी असे2, येळापूर चार, गवळेवाडी व मांगरूळ येथे प्रत्येकी 1असे एकूण तालुक्‍यातील चार गावात 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

बांबरवाडीत रुग्ण सापडल्याने गुढे -पाचगणी पठार,मांगरूळ,गवळेवाडी या तीन कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मांगरूळ व येळापूर येथील रुग्ण हे कोरोना बधितांच्या संपर्कातील आहेत. 

बांबरवाडी येथील पती पत्नी मुंबईहून येऊन शाळेत क्वारंटाईन झाले होते. 50 वर्षावरील रुग्णांचा स्वॅब पाठवला जातो,त्या प्रमाणे त्या रुग्णाचा स्वॅब पाठवला होता. आज त्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.गवळेवाडी येथील 70वर्षाचा वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ते आजरी असल्याने कराड येथे उपचारासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्‍यातील आज तीन गावे वाढली असल्याने एकूण 32 गावे कोरोना बाधित झालीआहेत. 

तालुक्‍याची स्थिती- 
मणदूर 63, रिळे , येळापूर 6 , निगडी 8, किनरेवडी , कोकरूड , शिराळा येथे प्रत्येकी 4 ,शिराळे खुर्द 20 , मांगले , मोहरे ,रेड , येथे प्रत्येकी 3 ,खेड , खिरवडे , सोनवडे - काळोखेवाडी , माळेवाडी , बिळाशी , चरण येथे प्रत्येकी 2 ,अंत्री खुर्द , करुंगली , चिंचोली , पणुंब्रे तर्फ शिराळा , लादेवाडी , पुनवत , नाटोली , कोकणेवाडी-आरळा , ढाणकेवाडी ,उपवळे , मोरेवाडी , मेणी- आटूगडेवाडी, गुढे- बांबरवाडी, गवळेवाडी येथे प्रत्येकी एक असे 31 गावातील 151 रुग्ण झाले असून 122 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मोहरे व मणदूर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे . 

संपादन - युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight patients in Shirala taluka