esakal | जामखेडमध्ये साडेआठ हजार होम क्वॉरंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

eight thousand home quarantines in Jamkhed

आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर तसेच पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहणे अनिवार्य असल्याचे गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे म्हणाले.

जामखेडमध्ये साडेआठ हजार होम क्वॉरंटाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड : आयव्हरी कोस्ट आणि फ्रान्समधील दोघे धर्मगुरू मशिदीत राहिले आणि त्यांनी जामखेडमधील तिघांना बाधा केली. त्या पाचजणांच्या संपर्कात हजारो नागरिक आले आहेत. त्यांचीही तपासणी केली जात आहे. त्यातील काहींचा रिपोर्ट येणे बाकी आहे. या सर्व घटनाक्रमामुळे जामखेड शहर देशाच्या रडारवर आलं आहे.

कोरोनाने पुणे, मुंबई शहरात कहर केला आहे. त्यामुळे तेथे व्यावसायासाठी गेलेले तसेच नोकरीसाठी गेलेल्यांनी गावचा रस्ता धरला आहे. त्यामुळे तालुक्यात बाहेरून आलेल्यांची संख्या वाढली आहे.

तालुक्‍यात मुंबई-पुणे व अन्य भागातून आलेल्या साडेआठ हजार नागरिकांना प्रशासनाने 'होम करोनोटाईन' केले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांनी दिली. तालुक्‍यातील सर्वत्र संचारबंदी आहे. बाहेरील व्यक्तींना प्रतिबंध आहे. गावोगावच्या हद्दी सील आहेत.

आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर तसेच पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहणे अनिवार्य असल्याचे गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे म्हणाले.

प्रमुख बाजारपेठा, धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये बंद आहेत. पाच कोरुना बाधित रुग्ण आढळल्याने शहराकडे येणारे सर्व रस्ते बंद आहेत. त्यामुळे बाहेरून कोणतेही वाहन गावात येत नाही. सर्व परिसर बंद असल्याचे तहसीलदार सुशील नाईकवाडे यांनी सांगितले. 

loading image