
असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते आज सांगली दौऱ्यावर होते.
सांगली : सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटना वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करा. राज्यात आपले सरकार आहे, अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण करण्याचे काम करा, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठकी दरम्यान ते बोलत होते.
पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ऐकून घेतल्यानंतर संघटनावाढी विषयी काही अडचणी असल्यास त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गुंठेवारी नियमित करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन शिंदे यांनी केले. ते म्हणाले, 'राज्य सरकार सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी विविध योजना राबवत आहे. त्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम करा.'
हेही वाचा - अनेक चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिकाही केल्या होत्या
यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शहर प्रमुख मयूर घोडके, शंभूराज काटकर, अमोल पाटील उपस्थित होते.
संपादन - स्नेहल कदम