
आटपाडी : येथील वृद्धाला दोघा अनोळखी भामट्यांनी हातोहात गंडविले. त्यांची २५ ग्रॅमची सोन्याची खरी चेन घेऊन बदल्यात १०० ग्रॅमचे खोटे सोन्याचे बिस्किट देऊन गंडवल्याचा प्रकार येथे घडला. जादा सोन्याचे आमिष वृद्धाच्या अंगलट आले. फसवणूकप्रकरणी शिवाजी महादेव चव्हाण यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.