जयंत पाटील यांच्या खेळीने भाजप घायाळ का ? 9 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल

election of mayor in sangli BJP and NCP parties leaders on front of
election of mayor in sangli BJP and NCP parties leaders on front of

सांगली : सध्या मिरज सांगली आणि कुपवाड या महापालिकांच्या महापौर निवडणुक चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या 23 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार असून बहुमत असूनही भाजपा सत्ता टिकवण्यासाठी धावपळ करत आहे. तर शेवटच्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादीने महापौर पद खेचून आणण्यासाठी भाजपचे सहा सदस्य गळाला लावले आहेत.

त्यामुळे या निवडणुकीत चुरस पहायला मिळत आहे. मात्र वरचढ कोण ठरणार याचा निकाल तर मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. भाजपने अडीच वर्षापुर्वी पुर्ण बहुमताने या तिन्ही महापालिकेत  सत्ता काबीज केली. एकूण 78 पैकी 41 जागा जिंकत भाजप स्वबळावर सत्तेत आले. मात्र यात राष्ट्रवादीतून आणि 
कॉंग्रेसमधून आलेल्यांची संख्या मोठी आहे. 

दरम्यान २०१८ मध्ये राज्याच भाजप सरकारची सत्ता असताना महापालिका निवडणूक जिंकून भाजपने इतिहास घडवला होता. आता मात्र राज्यात सत्ता बदल होवून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. महापौर आरक्षणही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपकडे बहुमत असले तरी अंतर्गत नाराजीचे सुरु उमटत आहेत. अनेकांना पक्षात घेताना पदे देण्याचे आश्‍वासनही दिले होते. पण नंतर मात्र त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे भाजपकडे बहुमत असले तरी ते निसटते आहे.

राष्ट्रवादी अशा नाराजांना गळाला लावण्याच्या प्रयत्नांत असुन सत्ता उलथवण्याच्या विचारात आहे. कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असला तरी भाजप फोडून बहुमतासाठी आवश्‍यक संख्याबळ खेचण्याचे काम राष्ट्रवादी करत असल्याने त्यांनी महापौरपदावर दावा केला आहे. भाजपचे बारा नाराज सदस्य फोडण्याचे काम सुरु असताना, तीन सदस्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यात भाजप नेते यशस्वी झाले. मात्र नऊ सदस्य अजूनही कव्हरेज क्षेत्राबाहेरच आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. 

बहुमताने आलेली सत्ता हातची घालवण्यास भाजप तयार नाही तर नाराजांनी आयती दिलेली संधी घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीची पुन्हा महापालिकेत सत्ता आणण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या महापौर निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सांगलीतील महापौर निवडणुकीचा खेळ हा केवळ सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेपुरता मर्यादित नसून भाजप ही निवडणूक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. 

पालकमंत्री जयंत पाटील सावज टप्प्यात आले तर कार्यक्रम करण्यात पटाईत असल्याचे त्यांना खबर होतीच. मात्र तरीदेखील भाजपचे नेते आपले नगरसेवकांवर कब्जात ठेवण्यात गाफील राहिले. राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आल्यानंतर महापालिकेत त्या दोघांकडून महापौर निवडीवेळी खेळ होणार याचे इशारे आधीच मिळाले होते. मध्यंतरी स्थायी समिती सभापती निवडी वेळीदेखील हा खेळ झाला होता. त्यावेळी थोडक्यात भाजप सत्ता बचावली हा अनुभव असतानादेखील चंद्रकांत पाटील आणि येथील दोन्ही आमदार खासदार सर्व गाफील राहिले अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com