'सांगलीत खानापूर नगरपंचायत विकासकामात अग्रेसर'

vishwajeet kadam said in khanapur sangli development work approve
vishwajeet kadam said in khanapur sangli development work approve

खानापूर (सांगली) : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकरीवर्गाला तातडीची १९ हजार कोटी रुपयांची मदत तसेच कोरोना काळात जनतेच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने अहोरात्र प्रयत्न केले असे प्रतिपादन सहकार मंत्री विश्वजित कदम यांनी केले. येथील नगरपंचायतच्यावतीने ३ कोटी ८२ लाख रुपयांचा तब्बल २९ विकासकामांचा शुभारंभ मंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात विश्वजित कदम बोलत होते. 

ते म्हणाले, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात तब्बल ४ कोटी रुपये कामांचा शुभारंभ करणारी खानापूर नगरपंचायत राज्यातील एकमेव नगरपंचायत असेल. आमदार अनिल बाबर म्हणाले, खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातील डीपी प्लॅन तयार करणार आहे. नगरपंचायत इमारतीसाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच नगरपंचायतीची टोलेजंग इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रसंगी आणखी कोट्यावधी रुपये मंजूर करणार आहे.

सत्ताधारी गटाचे नेते सुहास  शिंदे म्हणाले, नगरपंचायतीने शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्याने मोठी बक्षिसे मिळाली. यामुळे विकासकामे करता आली. गेल्या चार वर्षांत सहा कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करणार आहे. यावेळी त्यांनी खानापूरला एमआयडीसी मंजूर करण्याची मागणी मंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर यांच्याकडे केली.

कार्यक्रमास विटेचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्या नीलम सकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बापूराव शिंदे, जयदीप भोसले, गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, दादासो पाटील, डॉ.उदय हजारे, हर्षवर्धन माने, लालासो पाटील, संभाजी जाधव, तुकाराम जाधव, राजेंद्र शिंदे, राजन पवार, दादा भगत उपस्थित होते.

संंपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com