esakal | ...अन्‌ प्रणिती शिंदे मुंबईहून निघाल्या सोलापुरला Election Result 2019
sakal

बोलून बातमी शोधा

vidhansabha results 2019

Election Results 2019 : 11 फेऱ्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी निर्णायक मताधिक्‍याकडे वाटचाल केल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली. दरम्यान, 13 व्या फेरीनंतर त्यांचे मताधिक्‍य 11 हजारांहून अधिक झाल्याने विजय निश्‍चित झाल्याचा विश्‍वास होताच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

...अन्‌ प्रणिती शिंदे मुंबईहून निघाल्या सोलापुरला Election Result 2019

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 21 पैकी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अपक्ष उमेदवार महेश कोठे तर कधी एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी आघाडी घेत होते. त्यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसून होते, त्यांची धाकधूक वाढत होती. मात्र, 11 फेऱ्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी निर्णायक मताधिक्‍याकडे वाटचाल केल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली. दरम्यान, 13 व्या फेरीनंतर त्यांचे मताधिक्‍य 11 हजारांहून अधिक झाल्याने विजय निश्‍चित झाल्याचा विश्‍वास होताच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

विधानसभा निवडणुकीनंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट मुंबई गाठली. त्यांच्यासमोर शिवसेनेकडून माजी आमदार दिलीप माने, महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, एमआयएमचे फारुख शाब्दी यांचे तगडे आव्हान होते. या पंचरंगी लढतीत विजयाची खात्री नसल्याने त्यांनी मुंबई गाठल्याची चर्चा होती. दरम्यान, कोठे व शाब्दी यांना मागे टाकत मताधिक्‍य मिळवत असलेल्या प्रणिती शिंदे यांना विजयाबद्दल विश्‍वास झाला. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोबाईलवरुन शुभेच्छा द्यायला सुरवात केली. त्यावेळी त्या मुंबईहून तातडीने विमानाने सोलापुरला रवाना झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्या कार्यकर्ते अन्‌ पदाधिकाऱ्यांसमवेत विजयी जल्लोष साजरा करणार आहेत.