वीजपंप चोऱ्या थांबल्या पण.... चोरलेल्या पंप विकणाऱ्यांची साखळी कार्यरत

Electric pump theft stopped but .... chain of stolen pump sellers working
Electric pump theft stopped but .... chain of stolen pump sellers working

खरसुंडी (जि. सांगली) : खरसुंडी परिसरात विद्युत मोटारी चोरणारे चोरटे पोलिसांनी पकडल्यापासून, पंपाच्या चोऱ्या थांबल्या आहेत. मात्र या परिसरात दुसऱ्या भागातून चोरून आणलेल्या पंप व इंजिन विकणाऱ्यांची साखळी कार्यरत झाली आहे. याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. 

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात खरसुंडी परिसरात शेतकऱ्यांची विद्युत पंप चोरणारी चोरांची साखळी बरेच दिवस कार्यरत होती. एकाच साखळीतील त्यांच्यामध्ये मतभेद झाल्यामुळे चोरण्यात आलेले पंप घेऊन जात असताना पोलिसांना टीप दिल्यामुळे दोघांना पकडण्यात आले. चोरलेले दोन पंप पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली. तेव्हापासून पंप चोऱ्या कमी झाल्या आहेत. 

दरम्यान, दोन वर्षांच्या कार्यकाळात बऱ्याच शेतकऱ्यांचे पंप चोरीस गेले. त्याचा मात्र अद्याप छडा लागलेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रारही केली आहे. या परिसरात चोरलेले पंप दुसऱ्या जिल्ह्यात विकण्यात येत असल्यामुळे याचा तपास लागलेला नाही. सध्या पंप चोरीचे सत्र थांबले असले तरी नवी युक्ती लढवण्यात येत आहे.

दुसऱ्या तालुका व जिल्ह्यातील करण्यात आलेले पंप व इंजिन या परिसरात विकण्यात येत आहेत. चोरीच्या वस्तूतून फुकट पैसा मिळत असल्याने, ही साखळी सध्या कार्यरत झाली आहे. गरजू शेतकऱ्यांना या वस्तू आणून दिल्या जात आहेत व कमी किमतीत मिळत असल्यामुळे शेतकरीही गुपचूप राहून खरेदी करत आहेत. 

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे पंप चोरीला गेले ते शेतकरी अजूनही ते आपल्याला परत मिळतील या अपेक्षेत आहेत. पण चोरीचा छडा न लागल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पंप चोरीबरोबर खरसुंडी गावात पान व्यावसायिकांचे दुकाने फोडून किमती सिगारेटचीही चोरी करण्यात येत होती.

विद्युत पंप चोरणाऱ्या टोळीतील दोघांना पकडण्यात आल्यामुळे, या दुकाने फोडणाऱ्या चोऱ्याही सध्या थांबल्या आहेत. मात्र दुसरीकडून चोरलेल्या वस्तू विकून पैसे कमावण्याच्या साखळीलाही चाप लावण्याची गरज आहे. 

संपादन :  युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com