राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत येणार आता विजेवरील वाहने

4tiger
4tiger

कऱ्हाड - महाराष्ट्र हे कमी प्रदुषण करणारी वीजेवरील जास्तीत जास्त वाहने वापरणारे राज्य व्हावे यासाठी सध्या राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शासनाने इलेट्रीक व्हेईकल प्रोहोत्सान धोरणही घेतले आहे. त्याअंतर्गत सध्या जास्तीत जास्त विजेवरील वाहने रस्त्यावर आणण्यासाठीची कार्यवाही सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील प्रदुषण कमी करुन इंधनाची बचत होण्याबरोबरच पर्यावरण पुरक पर्यनटातुन वन्यप्राण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी वीजेवरील वाहने वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील अद्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. वाघांबरोबरच आता वीजवरील वाहनेही आता तेथील आकर्षण असणार आहेत. 

अलिकडे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातुन बाहेर पडणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढु लागले आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढु लागली आहे. त्यामुळे प्रदुषणात मोठी वाढ होत आहे. त्यातुन इंधनाचाही मोठ्या प्रमाणात साठा कमी होवु लागला आहे. त्याचा सर्वच पातळ्यांवर परिणाम होवु लागला आहे. त्यावर पर्यायांचा आता केंद्र व राज्य शासनामार्फत सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशात ६० लाख वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्याअंतर्गत १२० दशलक्ष बॅरल इंधन बचत करणे आणि ४० लाख टन कार्बनडाय आॅक्साईड उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र हे जागतीक स्तरावर जास्तीत जास्त विद्युत वाहने तयार करणारे आणि वापरणारे राज्य बनवण्यासाठी शासनामार्फतही प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शासनाने इलेट्रीक व्हेईकल प्रोहोत्सान धोरणही तयार केले आहे. त्याअंतर्गत आता व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटन आणि सफारीसाठी आता विजेवरील वाहनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पर्यावरण पुरक पर्यटन वाढवण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पांना स्वतंत्र निधीची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. 

सह्याद्री व्याघ्रमध्ये वीजेवरील वाहने 
पश्चिम महाराष्ट्रात सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नव्याने आकाराला आला आहे. सह्याद्रीच्या पट्यातील वाघांचे अस्तीत्व कायम राहुन त्यांच्या संवर्धनासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आता विविध उपाययोजना तेथे राबवण्यात येणार आहेत. सह्याद्रीतील पर्यटनाचा मार्ग निश्चीत झाल्यावर तेथेही सफारीसाठी वीजेवरील वाहनांचा वापर केला जाईल.

सफारीच्या दरात ५० टक्के सवलत 
वीजेवरील वाहनांमुळे इंधनाचा भार कमी होणार आहे. त्यामुळे पैशांचीही बचत होईल असे शासनाचे म्हणने आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात पर्यटन व सफारीसाठी आकारण्यात येणाऱ्या दरात पन्नास टक्के कपात होवु शकते असेही निर्देश शासनाने दिले आहेत. त्याचाही पर्यटकांना फायदा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com