गडहिंग्लज तालुक्यात हत्तीचा वावर (व्हिडिओ)

गणेश बुरुड
शुक्रवार, 24 मे 2019

महागाव - नेहमी चंदगड, आजरा तालुक्यात दर्शन देणाऱ्या हत्तीने आज सकाळी गडहिंग्लज तालुक्याची वेस ओलांडली. गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील हरळी खुर्द या गावात तब्बल दोन तास हत्तीने ठिय्या मारला होता. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

महागाव - नेहमी चंदगड, आजरा तालुक्यात दर्शन देणाऱ्या हत्तीने आज सकाळी गडहिंग्लज तालुक्याची वेस ओलांडली. गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील हरळी खुर्द या गावात तब्बल दोन तास हत्तीने ठिय्या मारला होता. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ व वन विभागाच्या मोठ्या प्रयत्नानंतर हत्तीला हुसकावण्यात यश आले आहे. पण त्याने महागाव जवळील रामतिर्थ परिसरात तळ ठोकला आहे.

हरळी गावातील शेतकरी आज पहाटे वैरागवाडी रोड परिसरातील म्हसोबा मोळा या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना हत्तीचे दर्शन झाले. त्यांनी तत्काळ गावांमध्ये फोन करून ग्रामस्थांना बोलवून घेतले. हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो गडहिंग्लज- चंदगड  मार्गावरून हरळी गावात आला. गावाशेजारील उसाच्या शेतामध्ये तब्बल दोन तास त्याने  ठिय्या मारला होता. त्यानंतर ग्रामस्थ व वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला हुसकावण्यात यश आले. हत्ती तेथून महागावच्या दिशेने पुढे गेला. महागाव जवळील रामतीर्थ परिसरात त्याने सध्या तळ ठोकला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elephant seen in Gadhinglaj Taluka