सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितचा पहिला बळी; कॅलिफाेर्नियावरुन आलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

निझरे (ता. जावळी) येथे मुंबईहून आलेल्या टॅक्‍सीचालकाच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या चार झाली आहे. त्यामुळे प्रशासन हाय अलर्ट झाले. संबंधित गावच्या परिसरात उपाययोजनांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आज जिल्हा रुग्णालयात चार तर, कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये सात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन संशयित रुग्णांसह श्‍वसन संस्थेतील संसर्गामुळे मृत झालेल्या बालिकेचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.

कास (जि. सातारा) : निझरे (ता. जावळी) येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणा तातडीने गावात दाखल झाली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने गावाला भेट देऊन राबवायच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या. रविवारी सायंकाळी सहानंतर संपूर्ण गावचा परिसर सील करण्यात आला आहे.
 
जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये कोरोना संशयित रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. त्यांचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळत आहेत. आज (रविवार) सायंकाळी पुण्यातील प्रयोगशाळेतून आलेल्या रिपोर्टने जिल्हा हादरून गेला. जिल्हा रुग्णालयात (ता. 4) दाखल करण्यात आलेल्या 54 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली करून उपाययोजना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रातांधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, मंडलाधिकारी संतोष मुळीक यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणा निझरे गावात धावली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निझरे व परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला गावात राबवायच्या उपाययोजनांबाबत सक्त सूचना दिल्या. त्यानंतर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन कामाला लागले.
 
कोरोनाबाधित व्यक्ती ही 21 मार्चला मुंबईवरून टेम्पोने गावी आली होती. या टेम्पोत 15 ते 20 लोकांनी एकत्र प्रवास केला होता. त्यानंतर ही व्यक्ती कुसुंबीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात ताप, सर्दी अशा लक्षणांमुळे तीन ते चार वेळा जावून उपचार घेऊन आली आहे. लक्षणे जास्त जाणवल्यानंतर त्याला काल जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही व्यक्ती वाळकेश्‍वरमध्ये (मुंबई) खासगी टॅक्‍सीचालक म्हणून काम करत आहे. 
आज (रविवार) सायंकाळी सहानंतर संपूर्ण गावाला चारही बाजूंनी सील करण्यात आले. मुख्य गेटसह गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावातील सर्वच कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आहे. हा कोरोनाबिधत रुग्ण ज्या-ज्या व्यक्तीच्या संपर्कात आली आहे, त्या सर्वांचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीने ज्या टेम्पोतून प्रवास केला, त्यातील इतर प्रवाशांची नावे घेण्याचे काम चालू होते. या व्यक्तीच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुली व मुलगा या सर्वांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. लोकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आले. 

 

  • निझरेत केलेल्या उपाययोजना... 
  • निझरे गावाची चारही बाजूंनी नाकाबंदी 
  • मुख्य गेटसह गावात पोलिस बंदोबस्त 
  • कोरोनाबिधित रुग्णाचे कुटुंब विलगीकरण कक्षात 
  • गावातील सर्वच कुटुंबांची आरोग्य तपासणी करणार 

     

Video : कॉंग्रेसमध्ये एक तरी दिवा दाखवा की ज्याने सांगितल्यावर लोक घरातील दिवे लावतील; पृथ्वीराज चव्हाणांना आव्हान 

तांबवे (ता. कऱ्हाड) येथील युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. तांबवे व त्या परिसरातील गावांचा सर्व्हे करून साठपेक्षा जास्त जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. सुदैवाने आत्तापर्यंत या युवकाशी संबंधित कोणालाही कोरोनाची बाधा झालेली नाही. आरोग्य यंत्रणा तपासणीत व्यस्त असतानाच आज निझरे (ता. जावळी) येथील 54 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्याला (ता. 4) उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (रविवार) दुपारी त्याच्या घशातील तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
 
संबंधित व्यक्ती हा वाळकेश्वर (मुंबई) येथे एकटाच राहात होता. तो गेल्या 14 वर्षांपासून खासगी कारचालक म्हणून काम करत आहे. आठ मार्चला एका टेम्पोने ते गावी आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप व सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे ते जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू केले आहेत. 

अहवाल हाती आल्यानंतर आज दुपारपासूनच प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित व्यक्ती कुठे-कुठे गेला होता, कोणाच्या संपर्कात आला होता, याची माहिती प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासीयांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच संबंधित गाव व त्याच्या परिसरातील अन्य गावांचा सर्व्हेही आरोग्य विभागाने सुरू केला आहे. 
दरम्यान, काल कऱ्हाडतील दोन संशयित व श्‍वसन संस्थेतील संसर्गामुळे मृत झालेल्या बालिकेचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या 31 वर्षीय युवकाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. आज कृष्णा हॉस्पिटलमध्ये एक ते 85 वयोगटातील सहा पुरुष व एक महिला अशा सहा नागरिकांना श्‍वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 30 वर्षांचा पुरुष हा कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासीय असल्याचे निदर्शनास आले आहे. परदेश प्रवास करून आलेल्या 67 वर्षीय पुरुषासही विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. कऱ्हाड व सातारा येथे मिळून 11 नागरिकांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथील रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आहेत. 

मरकजला गेलेले आणखी चौघे दाखल
 
दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील मरकज येथे गेलेल्या साताऱ्यातील चौघांची नावे सांगली पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यानंतर जिल्ह्यातील 25 ते 27 वयोगटातील चार युवकांना आज कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर यापूर्वी दाखल असलेल्या दोन कोरोनाबाधित संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याचेही डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.

Coronavirus : सातारा जिल्ह्यात रुग्णांची संख्या पाेचली चारवर

सातारा जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेले दोन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा (कॅलिफाेर्नियावरुन आलेल्या) रुगणाचा आज (साेमवार) पहाटे मृत्यू झाला. या दाेन्ही रुग्णांचे पहिल्या 14 दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले हाेते. आज (साेमवार) 15 व्या दिवसासाठीचे नमुने पाठविले जाणार हाेते. 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  आमोद गडीकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven Coronavirus Suspeced Patient Admitted In Satara District