Video : कॉंग्रेसमध्ये एक तरी दिवा दाखवा की ज्याने सांगितल्यावर लोक घरातील दिवे लावतील; पृथ्वीराज चव्हाणांना आव्हान

Video : कॉंग्रेसमध्ये एक तरी दिवा दाखवा की ज्याने सांगितल्यावर लोक घरातील दिवे लावतील; पृथ्वीराज चव्हाणांना आव्हान

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संस्था, संघटना चांगले काम करत आहेत. मात्र आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाची खिल्ली उडवली. ही गोष्ट वेदनादायी आहे. एका संसुस्कृत राजकारण्याने अशा पध्दतीने खिल्ली उडवणे म्हणजे वैचारीक दिवाळखोरीच आहे, अशी टिका राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी आमदार चव्हण यांच्यावर केली. लोकांची दिशाभुल करु नये, लोक पंतप्रधांनाबरोबरोबर असुन देशातील लोकं दिवे लावणार, टाळ्या वाजवणारच, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी दिवे लावण्यासंदर्भात पंतप्रधानांवर केलेल्या टिकेच्या पार्श्वभुमीवर श्री. चरेगावकर बोलत होत. ते म्हणाले, कोरोनाचा विषय सुरु झाल्यापासुन पंतप्रधान मोदी चांगल्या पध्दतीने परिस्थीती हाताळत आहेत. जगातील कोरोनाबाधीत राष्ट्रांनी मोदींच्या कामाचे कौतुक करुन त्यांनी लीडरशीप करावी, असे म्हंटले. असे असताना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे असे वकत्व्य करतात हे घृणास्पद आहे. त्याचा मी निषेध करतो. देशावर संकटे येतात अशावेळी देश एकसंघ व्हावा यासाठी देशाच्या नेत्याची भुमिका महत्वाची असते.

चरेगावकर म्हणाले पाकीस्तान युध्दात आपण विजय मिळवला. हे आपण पाहिले आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात गांधीजी चरखा चालवत होते. त्यातुन स्वातंत्र्य मिळाले होते का ? पण देशासाठी एक बलीदान म्हणुन ते चरखा चालवत होते. पंतप्रधान ज्या पध्दतीने काम करत आहेत, पोट तिकडीने विषय मांडत आहेत, सारा देश त्यांना प्रतिसाद देत आहेत. अशावेळी राजकारणातील व्यक्तींनी पंतप्रधानाविरोधात वकत्व्य करणे हे अशोभनीय कृत्य आहे. राज्याचा उर्जामंत्र्यांनी तारे तोडले आहेत. तुम्ही इतिहास तपासुन बघा. ज्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. त्यावेळी आठ-दहा तास वीज देत नव्हता. हे अगोदर बघा. ही लाजीवरवानी बाब आहे. मग नऊ मिनींटासाठी तुम्ही काय वक्तव्य करताय हे तपासा.
 
ते म्हणाले, देशाला कणखर पंतप्रधान मिळाला आहे. त्यांच्या हाकेला देशातील नागरीक साथ देत असल्याने कॉंग्रेसच्या पोटात पोटशुळ उठले आहे. कॉंग्रसच्या नेत्याने आवाहन केले तर त्याला देश पाठिंबा देईल असा एकादा तरी नेता कॉंग्रेसकडे आहे का ? याचा खुलासा चव्हाण यांनी करावा.  देशात एकादा नेता निर्माण होत असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर मिळत असेल तर अशा पध्दतीने वक्तव्य करणे म्हणजे समाजात दुही पसरवण्यासारखे आहे. आपल्या मतदार संघात मोदींवर टिका केलेली बातमी छापण्याएेवजी कोरोनाच्या संकटात तुम्ही एखादे सामाजीक काम उभे केले, मास्क वाटले, शंकांचे निरसन केल्याचे कुठे वाचनात आले नाही. आम्ही काही बोललो तर ते मी खालच्या लोकांशी बोलत नाही, असे सांगतात. जरुर आम्ही छोटे आहोत मात्र त्यामुळे तुम्ही मोठे होवु शकत नाही. तुम्ही अनुभवी आहात तर केंद्र सरकारला कोरोनासंदर्भातील एखादी योजना सांगा.

चमकण्यासाठी माेदी एकही संधी साेडत नाहीत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका

पोलिसांना रात्रंदिवस काम करावे लागत आहे, लोकांनी कशी काळजी घेतली पाहिजे हे सांगा. मात्र त्यांना हे सुचत नाही. कॉंग्रेसमध्ये एक तरी दिवा दाखवा की ज्याने सांगितल्यावर लोक घरातील दिवे लावतील किंवा वीझवतील. चांगल्या गोष्टीबद्दल टिका करायची बंद करा. तुमच्या पक्षाला 50 च्या वर खासदार निवडुण आणता येत नाहीत. मध्यप्रदेशमध्ये तुम्ही गेला तेथे तुमचे सरकार पडले आणि देशाच्या पंतप्रधानावर टिका करणे हे खिल्ली उडवण्यासारखे आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com