esakal | CA परीक्षेत सांगलीचा झेंडा: 11 जण उत्तीर्ण; दोन मुलींचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

CA परीक्षेत सांगलीचा झेंडा: 11 जण उत्तीर्ण; दोन मुलींचा समावेश

एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी सीए होण्याचा मान सांगलीकरांनी प्रथमच मिळवला.

CA परीक्षेत सांगलीचा झेंडा: 11 जण उत्तीर्ण; दोन मुलींचा समावेश

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेत यंदा जिल्ह्यातील १४० पैकी ११ जणांनी यश मिळवले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी सीए होण्याचा मान सांगलीकरांनी प्रथमच मिळवला आहे. यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.

यंदा जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटने जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील अकरा जणांनी यश मिळवले. यामध्ये नऊ मुले, तर दोन मुली आहेत. या परीक्षेसाठी जुन्या अभ्यासक्रमाच्या ग्रुप एकमधून १७ उमेदवार बसले होते. त्यापैकी तिघे उत्तीर्ण झाले. तर ग्रुप दोनमधील २५ उमेदवार परीक्षेस बसले त्यापैकी चौघे उत्तीर्ण झाले.

नवीन अभ्यासक्रमाच्या पहिल्या ग्रुपमध्ये ४३ जण परीक्षेस बसले होते त्यापैकी पाच जण उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून २६ जणांपैकी चौघे उत्तीर्ण झाले. अंतिम परीक्षेत अकरा जण उत्तीर्ण झाले. सीएची परीक्षा अवघड असते त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे मोठे यशच मानले जाते. या परीक्षेचा निकाल नेहमीच फार कमी लागतो. सांगली जिल्ह्यातूनही ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मात्र यंदा या परीक्षेत तब्बल अकरा जणांनी यश मिळवल्यामुळे सी ए करू इच्छिणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी जिल्ह्यात एकावेळी सहा-सात विद्यार्थीच सीए परीक्षेत उत्तीर्ण होत होते.

जिल्ह्यातून सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी:

अजय मंगलानी, पराग गणबावले, चैताली कुलकर्णी, नितीन कोरूचे, प्रतीक झंवर, कृष्णा मालू, शुभम पवार, अभिजित पाटील, अझहरुद्दीन नायकवडी, सिद्धार्थ मालू, पुष्पांजली निशाणदार.

सीए परीक्षेचा निकाल यापूर्वी सात ते दहा टक्के इतकाच लागत होता. तुलनेने कमी उमेदवार उत्तीर्ण होत होते. मात्र या निकालामुळे सीए होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. जिल्ह्यासाठी हा निकाल उच्चांकी म्हणता येईल. सांगलीतूनही सी ए परीक्षा उत्तीर्ण करता येऊ शकते हा एक आत्मविश्वास या निकालाने सांगलीतील उमेदवारांना मिळेल. यावर्षी १७ टक्के निकाल लागला आहे. या निकालामुळे हुशार विद्यार्थ्यांना केवळ इंजिनिअरिंग अथवा मेडिकल हेच करियर नसून सनदी लेखापाल हे एक मोठे क्षेत्र असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सीए होण्याकडेही उमेदवारांचा कल वाढण्यासाठी या निकालाने प्रोत्साहन मिळेल.

महेश ठाणेदार, अध्यक्षसीए असोसिएशन, सांगली शाखा

loading image
go to top