बेळगाव : वझर धबधब्यामध्ये बुडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे
Drowning, Belgaum Latest News Updates
Drowning, Belgaum Latest News UpdatesSakal

बेळगाव - तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधब्यामध्ये बुडून अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हार्दिक प्रवीण परमार (वय २२, मूळ रा. गोवा सध्या रा. एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालय शिवबसववगर) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. रविवार महाविद्यालयाला सुट्टी असल्याने हार्दिक हा आपल्या एका मित्रासमवेत तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधब्यात पोहण्यासाठी गेला होता. तो अभियांत्रिकीच्या आठव्या सेमीस्टरमध्ये शिकत होता. पोहण्यासाठी हार्दिकने पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देऊन जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात शोध मोहीम राबवून सायंकाळी मृतदेह पाण्यावर काढला. त्यानंतर ही माहिती मृत हार्दिकच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली. त्याचे नातेवाईक गोवा येथून परतल्यानंतर मृतदेहावर शल्यचिकिस्ता केली जाणार आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. (Belgaum Latest News Updates)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com