"अलकुड एस'ला प्रवेश बंदी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

रांजणी (सांगली) ः अलकुड ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव गावातील लोकांना होऊ नये, यासाठी अलकुड एसच्या मुख्य प्रवेश द्वार म्हणजे वेसला काठी व दोरी बांधून बाहेरच्या इतर गावातील लोकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे, व गावातील लोकांना गाव सोडण्यास बंदी करण्यात आली आहे.

अगदी अत्यावश्‍यक असेल तरच प्रवेश दिला जातो किंवा बाहेर सोडले जाते,गावातील ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षक मुले नेमून वेशीवर नोंदणी ठेवली आहे. त्यामध्ये गावात येणारे व जाणाऱ्यांची नोंद ठेवली जाते, तसेच ग्रामपंचायतीतर्फे लाऊडस्पीकर लावून कोरोनाविषयी गावातील लोकांना माहिती देण्यासाठी वाडी वस्तीवर गाडी फिरवली जात आहे. यावेळी स्पीकरवरून कोरोना विषाणू विषयी जनजागृती करण्यात आली, कोरोना विषाणू बद्दल माहिती दिली जाच आहे.

तसेच कोरोना विषाणूची लागण कशी होते, त्याची लक्षणे काय आहेत व जणतेने काय काय काळजी घ्यावी, याबद्दल माहिती सांगण्यात येत आहे. आरोग्य सेविका, पोलिस पाटील युवराज पाटील यांनी पुण्या-मुंबईतून येथून गावी आलेल्या माणसांना घरी भेट देऊन चौकशी केली व तपासणी करण्याविषयी सांगितले.अलकुड एसच्या सरपंच सौ मनीषा कांबळे, युवक उपसरपंच सुरज चौगुले, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ओलेकर, आबा बंडगर यांनी नियोजन केले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrance Closed "Alcud S'