नयनरम्य आतषबाजीत कवठे एकंदचा आसमंत उजळला 

sangli dussehra firework
sangli dussehra firework
Updated on: 

कवठे एकंद : महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवठे एकंद (ता. तासगाव) येथे श्री सिध्दराजाच्या पालखी सोहळा काल रात्री उत्साहात झाला. पालखीसमोर रात्रभर शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात आली. रात्री आठ वाजता सुरु झालेला सोहळा आज सकाळी आठपर्यंत म्हणजे तब्बल बारा तास सुरु होता. नेत्रदीपक आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. दोनशेहुन अधिक मंडळांनी पालखी समोर सुरक्षित आतिषबाजी करीत उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
 
प्रशासनाने कडक नियम केले होते. त्याच्याशी सांगड घालत लाकडी शिंगटे एकाच ठिकाणी सिध्दराज मंदिराजवळील मोकळ्या जागेत लावली होती. कोणालाही इजा झाली नाही. दारूकामामुळे भाजण्याचा प्रकार घडला नाही. उत्सव शांततेत झाला. तासगांवचे तहसीलदार सुधाकर भोसले, प्रांताधिकारी विकास खरात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलिस उपाधिक्षक अमरसिंह निंबाळकर, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे रस्त्यावर ठाण मांडून होते. त्यांच्यासह पोलीस अधिकारी, मंडल अधिकारी व कर्मचारी, आरोग्य पथक, तासगांव पालिकेचेचे अग्निशमन पथक, रूग्णवाहिका महावितरणचे कर्मचारी, आपत्कालीन यंत्रणा रात्रभर सज्ज होती. 
येथे दसऱ्याला होणारी शोभेच्या दारूची आतषबाजी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. श्री सिध्दराज महाराजच्या पालखीसमोर रात्रभर रंगीबेरंगी शोभेची दारू उडवली जाते. 
प्रमुख मार्गावरून व घरासमोरही आतषबाजी होते. दारुकाम प्रत्येकाच्या घरी होते. उत्सवासाठी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. शोभेचे दारूकाम करताना स्फोटासारख्या घटना न होता सुरक्षित दारुकाम कसे करण्यात येईल याबद्दल प्रशासनाने काळजी घेतली. प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी , यात्रा कमिटीने विशेष ग्रामसभा घेत गावकऱ्यांशी चर्चा केली. एक प्रकारे सुरक्षित उत्सव कसा करावा याचा वस्तूपाठ घालून दिला. 
ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत ठराव केल्याप्रमाणे आतषबाजीसाठी पांढऱ्या दारूचा वापर केला नाही. धोकादायक पत्रिबाण उडवले नाहीत. 

काल रात्री आठला सोहळा सुरु झाला. मंदिरापासुन निघून तो बसस्थानक चौकात आला. तेथे पारंपारिक पध्दतीने पूजा होऊन सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. आरतीनंतर उत्सवाला सुरुवात झाली. रात्रभर आतषबाजी सुरू होती. आझाद दारु शोभा मंडळाने दहशतवाद्याविरूद्धच्या कारवाई, नयनदिप दारु शोभा मंडळाने भारतीय सैन्याने केलेले सर्जिकल स्ट्राईक, आझाद मित्र मंडळाने महागाईचा भस्मासुर, इतर मंडळांनीही औट, लाकडी शिंगटे, फुगडी, कागदी शिंगटे, झाड, मोर यासह विविध प्रकारांत आतिषबाजी सादर केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com