राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण संपन्न

अरुण गव्हाणे
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

काकडी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांना विमानतळ प्राधिकरणाने निमंत्रण पत्रिका दिली होती मात्र त्यांना पास दिले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.जमिनी देउन प्राधिकरणाने शेतक-यांशी असे वागणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. गावचे प्रथम नागरीक म्हणुन सरपंच यांना तरी प्रातिनिधीक स्वरुपात पास देणे आवश्यक होते असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.

पोहेगाव (जि अ.नगर) - साईभक्तांच्या सोईसाठी काकडी येथे झालेल्या नव्या विमानतळाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते आज सकाळी पार पडले. सकाळी वायुसेनेच्या विमानाने 9 वाजुन 56 मिनीटाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विमानाला हिरवा झेंडा दाखवुन विमानतळाचे उदघाटन केले. 

विमानतऴाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी अगदी ठराविक लोकांनाच पास देण्यात आले होते.उद्घाटन झाल्यानंतर विमानतऴावरुन 10 वाजुन 25 मिनीटांनी राष्ट्रपतींच्या गाड्यांचा ताफा शिर्डीच्या दिशेने रवाना झाला. यावेळी वाहनांचा ताफा पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. उदघाटनप्रसंगी विमानतळ विकास प्राधिकरणचे व्यवस्थापकिय संचालक सुरेश काकणी,श्रीमती वलसा नारायण नायर सिंग,जिल्हाधिकारी अभय महाजन,पोलीस प्रमुख रंजनकुमर शर्मा आदिसह आधिकारी व पदाघिकारी  उपस्थीत होते.

काकडी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांना विमानतळ प्राधिकरणाने निमंत्रण पत्रिका दिली होती मात्र त्यांना पास दिले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.जमिनी देउन प्राधिकरणाने शेतक-यांशी असे वागणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. गावचे प्रथम नागरीक म्हणुन सरपंच यांना तरी प्रातिनिधीक स्वरुपात पास देणे आवश्यक होते असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Web Title: esakal shirdi airport president ramnath kovind