सांगलीत करेक्ट कार्यक्रम; जिल्हा बॅंकेत भाजपच्या माजी आमदाराला पराभवाचा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करेक्ट कार्यक्रम; जिल्हा बॅंकेत भाजपच्या माजी आमदाराला पराभवाचा धक्का

करेक्ट कार्यक्रम; जिल्हा बॅंकेत भाजपच्या माजी आमदाराला पराभवाचा धक्का

आटपाडी : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी तब्बल अकरा मतांनी पराभव करून अनेक उपेक्षित धक्का दिला. 1995 मध्ये माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी करून आमदार अनिल बाबर यांच्या विरोध अपक्ष निवडणूक लढवू आमदारकी खेचून आणली होती. त्यानंतर गेली वीस वर्षे ते विधानसभेला दरवेळी पाठिंबा देत आले होते. माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणीचे अध्यक्ष, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यासह जिल्हा बँकेचे संचालक यासारखी अनेक पदे त्यांनी भूषविली होती.

गेली पंचवीस वर्षे त्यांच्याकडेच जिल्हा बँकेचे संचालक पद कायम होते. दरवेळी ते मोठ्या मताधिक्‍याने एक तर्फे निवडून येत होते. यावेळी त्यांच्या विरोधात महाविकासआघाडीने शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांना विकास सेवा सोसायटीच्या गटातून उमेदवारी दिली होती. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यासारखी दिग्गज नेते मंडळी त्यांच्यासोबत होती. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांनीही समर्थन दिले होते. तर तानाजी पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि आमदार अनिल बाबर यांनी बळ दिले होते.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँकेत आजी-माजी आमदारांचा पराभव

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजप- राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत आटपाडीत मोठा राडा झाला होता. त्यामुळे निवडणुकीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दोन्ही बाजूने मतदारांना अज्ञात स्थळी हलवले होते. मतदानानंतर दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे उमेदवार पाहिजे पाटील यांनी 40 मध्ये घेऊन ११ मतांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव करून साऱ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला आहे. आप्पा भाऊ देशमुख आणि पडळकर गटाचा मानहानिकारक पराभव मानला जातो.

हेही वाचा: 'मोठं कारस्थान', शशिकांत शिंदेंची पराभवानंतर प्रतिक्रिया

loading image
go to top