esakal | लोकसभेसाठी मदत न केलेल्यांचा विधानसभेत 'हे' करणार कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसभेसाठी मदत न केलेल्यांचा विधानसभेत  'हे' करणार कार्यक्रम

कोल्हापूर - ‘ शरद पवार यांच्या निष्ठेपोटी मी राष्ट्रवादीत राहिलो. मी विधानसभेला इच्छुक नाही, २०२४ ला मी लोकसभेला भाजपचे नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडणार आहे. त्यामुळेच मला मदत न करणाऱ्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत कार्यक्रम करणार आहे.’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची ऑफर दिली होती, असेही ते म्हणाले.

लोकसभेसाठी मदत न केलेल्यांचा विधानसभेत 'हे' करणार कार्यक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ‘ शरद पवार यांच्या निष्ठेपोटी मी राष्ट्रवादीत राहिलो. मी विधानसभेला इच्छुक नाही, २०२४ ला मी लोकसभेला भाजपचे नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडणार आहे. त्यामुळेच मला मदत न करणाऱ्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत कार्यक्रम करणार आहे.’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची ऑफर दिली होती, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते. श्री. महाडिक म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत माझ्याविरोधात काम केलेल्या किंवा मदत न केलेल्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत कार्यक्रम करावा लागेल. मला उमेदवारीच मिळू नये, यासाठी दस्तुरखुद्द आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले, निवडणुकीत ते माझ्यासोबत होते; पण दोन्ही काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या व्यासपीठावर होते, असेही ते म्हणाले. 

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर विजयी झालो होतो. गेल्या पाच वर्षात चांगले काम केले, आठ हजार कोटींचा निधी आणला. तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाले; पण या निवडणुकीत मला उमेदवारीच मिळू नये यासाठी प्रयत्न झाले. राष्ट्रवादीचे मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हेही त्यात होते. त्यांनी वर्षभरापूर्वीच माझ्या उमेदवारीला विरोध केला. त्यानंतरच वातावरण दूषित झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांचा विरोध डावलून मला उमेदवारी दिली.’’

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘आमच्या सगळ्यांचा विरोध असताना मी उमेदवारी स्वीकारली. श्री. पवार हे सगळे दुरुस्त करतील, असे त्या वेळी वाटत होते. प्रचारासाठी श्री. पवार पाचवेळा कोल्हापुरात आले, त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आले नाही. श्री. मुश्रीफ माझ्यासोबत होते, काँग्रेसचे बहुतांश नेते सेनेच्या व्यासपीठावर होते, श्री. पवार यांनाही हे चित्र बदलता आले नाही. चांगले काम करून झालेला पराभव माझ्यासह कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. या पक्षात आपले भवितव्य नाही हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.’’

सतेज यांच्यामुळे पराभव नाही
आमदार सतेज पाटील यांनी विकासात्मक एकही काम केलेले नाही. थेट पाईपलाईनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. शहरावर टोल याच मंडळींनी लादला. त्यांना कुणाचे चांगले करता येत नाही, वाईट करायचे तेवढे त्यांना माहीत आहे. त्यांच्यामुळे माझा पराभव झालेला नाही, असेही 
श्री. महाडिक या वेळी म्हणाले.

loading image
go to top