esakal | कोयना नदीपात्रात माजी सैनिकासह विद्यार्थी बुडाला 
sakal

बोलून बातमी शोधा

Karhad-incidence

पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.

कोयना नदीपात्रात माजी सैनिकासह विद्यार्थी बुडाला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे  खळबळ उडाली असुन त्यांना शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. जयसिंग पाटील (वय ६७) आणि रत्नेश वायदंडे (वय १४) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत

सुपनेतील जयसिंग पाटील हे माजी सैनिक आहेत. ते सुपनेतील तालमीत कोच म्हणुनही काम करत. आज सकाळी ते तालमीतील काही मुलांसमवेत सुपनेतील कोयना नदीकाठी पोहायला गेले होते. रत्नेश पोहायला शिकत होता. त्यामुळे त्याच्या पाठीवर कॅन बांधला होता. मात्र नदीपात्रात काही अंतर गेल्यावर त्याचा बांधलेला कॅन सुटला. त्यामुळे तो पाण्यात बुडु लागला. ते पाहिल्यावर जयसिंग पाटील यंनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यांनी त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्याला शोधत असताना तेही बुडाले आहेत.

दरम्यान तेथे पोहण्यासाठी आलेल्या अन्य मुलांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात अपयश आले.  त्याची माहिती गावात वाऱ्यासारखी परसली. सकाळपासुन त्यांची शोध मोहिम सुरु आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

loading image
go to top