
विटा : सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून कारखान्याकडे ऊस नेला जात आहे. मात्र, ट्रॉलीत क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जात आहे. रस्त्यावरून भरलेली ट्रॉली जात असताना कधी अंगावर कोसळेल, याचा नेम नसल्याने ही क्षमतेपेक्षा अधिक होणारी ऊस वाहतूक वाहनधारक व नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे चित्र आहे. ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर (परावर्तक) नसल्याने अपघात होत आहेत. कारखाना प्रशासनाने ट्रॅक्टर चालक व मुकादमांना ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि ट्रॉलीच्या प्रमाणात ऊस भरण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.