
-बलराज पवार
राजस्थानमधील जैसलमेर येथे वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची ५५ वी बैठक झाली. या बैठकीत बेदाण्यावरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली होती, ती या परिषदेत मान्य करण्यात आली. त्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या वतीने बैठकीस उपस्थित असलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. हळद, गूळ याप्रमाणे बेदाणेही कृषी उत्पादन असल्यामुळे त्यावरील जीएसटी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. द्राक्षापासून तयार होणारे बेदाणे हे कोणतीही प्रक्रिया न करता तयार केले जात असल्याने त्याचा समावेश कृषी उत्पादनात करण्यात आला. त्यामुळे पाच टक्के कराच्या कक्षेतून बेदाणा वगळण्यात आला आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून विक्री होणारे मणुके करमुक्त झाले आहेत.