esakal | अनुभव सातासमुद्रापारचे : गारठलेल्या टोरांटोत झळा

बोलून बातमी शोधा

Experience  Abroad : frozen Toronto hit toronto

सांगलीतील डॉ. तृप्ती गायकवाड सध्या कॅनडाची टोरांटो शहरात कार्यरत आहेत. तिथल्या शांतिग्राम वेलनेस आयुर्वेद सेंटरमध्ये त्या केंद्रप्रमुख आहेत. सध्याच्या कोरोना कालखंड आणि व्यवस्थेबद्दलचे अनुभव मांडले आहेत. 

अनुभव सातासमुद्रापारचे : गारठलेल्या टोरांटोत झळा
sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगलीतील डॉ. तृप्ती गायकवाड सध्या कॅनडाची टोरांटो शहरात कार्यरत आहेत. तिथल्या शांतिग्राम वेलनेस आयुर्वेद सेंटरमध्ये त्या केंद्रप्रमुख आहेत. सध्याच्या कोरोना कालखंड आणि व्यवस्थेबद्दलचे अनुभव मांडले आहेत. 

भारतात नव्या 2020 वर्षांची सुरवात मी कुटुंबासह सहा फेब्रुवारीला कॅनडाला परतले. न्यूयार्कमध्ये माझी कनेक्‍टिंग प्लाईट चुकली. कारण विमानतळावरच कोविड-19 साठी प्रवाशांची कसून चौकशी सुरू होती. राजधानी टोरांटोत (कॅनडा) परतले आणि दुसऱ्याच दिवशी माझं क्‍लिनिकही सुरू झालं. कामासोबतच कोविडच्या माहिती मिळवण्यात फेब्रुवारी सरला. मार्चच्या सुरवातीलाच इथल्या बर्फ थंडीत कोविडच्या झळा जाणवू लागल्या. क्‍लिनिकमधील अपॉईंटमेंट रद्द होऊ लागल्या. सर्दी, खोकल्याची लक्षणे असल्यास अथवा 14 दिवसांमध्ये आंतराष्ट्रीय प्रवास केला असल्यास ऍपाईंटमेंट न देणे, बंधनकारक झाले. सरकारी कार्यालयातील कर्मचारी विशेष ड्रेससह मास्क-हातमोजे वापरून काम करीत होते. तिथंही प्रत्येकाला सखोल चौकशीअंती प्रवेश मिळतो. तिथली यंत्रणा मात्र लोकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असते. 

गेल्या 15 मार्चपासून इथले सर्व व्यापार-उद्योग व्यवहार ठप्प आहेत. काल अखेर 25 हजार 680 बाधित रुग्ण आहेत. त्यातले 7 हजार 756 कोरोनामुक्त झाले असून 780 मृत्यू झाले आहेत. अजूनही कॅनडा पूर्ण लॉकडाऊन नाही. इथले पंतप्रधान जस्टीन ट्रुडो दररोज पत्रकार परिषदांद्वारे सूचना देतात. त्याचे सर्वजण काटेकोर पालन करतात. अगदी गरजेशिवाय कोणी घराबाहेर पडत नाही. वावरही ठरावीक अंतर ठेवूनच असतो. अनेक रुग्ण माझ्या संपर्कात असल्याने माझे कुटुंब कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली सतत असते. लॉकडाऊनध्येही माझी सेवा अखंड सुरू आहे. मात्र रुग्णांकडून माझीही काळजी घेतली जाते. अनेक रुग्ण थोडी जरी सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसली तर किंवा कुठे प्रवास केला असेल तर स्वतःहून माझी अपॉईंटमेंट रद्द करतात. ते परस्पर कोविड तपासणी केंद्राशी संपर्क साधतात. कित्येकांनी तर शेजारी जरी रुग्ण आढळला तरी मला धोका नको म्हणून ते क्‍लिनिकमध्ये येत नाहीत. 

माझे पती हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सेवेत आहेत. ते घरीच असतात. त्यांचे काम बंद आहे. सध्याच्या बिकट काळात आम्ही पूर्वी ज्याप्रमाणात कर दिला त्या प्रमाणात शासनाने आमच्या बॅंक खात्यांवर रकमा जमा केल्या आहेत. माझ्या खात्यावर दोन हजार डॉलर जमा झाले आहेत. नित्य जगण्याचा प्रश्‍न तूर्त सुटला आहे. उणे एक ते पंचवीस तीस इतके तापमान असते. सध्या स्नो फॉल सुरू आहे. इथे सारे फ्रोजन फुड असते. चायनातील खाद्यपदार्थांवर पूर्ण निर्बंध असले तरी अन्य देशांतून खाद्यपदार्थांना मुभा आहे. 

सध्याच्या काळात आपण कोविड-19 पासून आपण वाचू कसे यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही परिस्थिती जादूप्रमाणेच बदलणार नाही. हा काळ किती माहीत नाही. आपण आपल्या परीने देशासाठी सेवा-योगदान दिले पाहिजे. शासनाने आवाहन करताच इथे लोकांनी आपण देऊ शकत असलेल्या मदतीची संकेतस्थळावर माहिती दिली असून त्यानुसार लोक योगदानही देत आहेत. आपल्याकडेही शासनाने तसे आवाहन केले आहे. भारतातील माझ्या कुटुंबीयांची मला खूप आठवण येते. पण धीर न सोडता आपण या संकटाचा मुकाबला केला पाहिजे.