Koyna Dam : कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यात अडचण नाही, पण..; मंत्री देसाईंनी आमदार गाडगीळांना सांगितलं 'हे' कारण

सातारा पालकमंत्री देसाई यांनी कोयनेतून विसर्ग बंद करण्याचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desaiesakal
Summary

कोयना धरणातून पाणी सोडू नये, अशा स्वरुपाचे कोणतेही आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आलेले नाहीत.

सांगली : जिल्ह्यातील शेती, सिंचन पाणी योजना; तसेच पिण्यासाठी कोयना धरणातून (Koyna Dam) पाणी सोडण्यास कोणतीही अडचण नाही, असे स्पष्टीकरण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले. आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी चर्चा करताना मंत्री देसाई यांनी हे स्पष्टीकरण दिले.

आमदार गाडगीळ (Sudhir Gadgil) म्हणाले, ‘‘जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने शेतीसह पिण्याची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. मात्र हे पाणी सोडू नये, असे आदेश दिल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत साताराचे पालकमंत्री देसाई यांच्याशी चर्चा केली.

Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
Koyna Dam : पाण्यासाठी खासदारकी लावली पणाला, मंत्री देसाईंवर फोडलं खापर; आता मुख्यमंत्रीच मिटविणार 'कोयना वाद'

त्या वेळी श्री. देसाई यांनी सांगितले की, कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना, तसेच सांगली शहरासह सर्व शहरांसाठी पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. कोयना धरणातून पाणी सोडू नये, अशा स्वरुपाचे कोणतेही आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आलेले नाहीत.’’

Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरुन प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..; वाहतुकीत केलाय बदल

‘‘मंत्री देसाई यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यातील सर्व सिंचन योजना, तसेच सांगली शहरासह सर्व शहरांसाठी पिण्याचा पाणीपुरवठा करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग थांबणार नाही. आवश्यकता भासेल त्याप्रमाणे पुरेसे पाणी सोडण्यात येईल, याबाबत कोणीही शंका घेऊ नये,’’ अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे आमदार गाडगीळ म्हणाले.

आमदार गाडगीळ म्हणाले, ‘‘शहर आणि जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहे. परंतु साताराचे पालकमंत्री देसाई यांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे आहे. शिवाय, या विषयाकडे सातत्याने लक्ष देऊन आहे. ज्या वेळी सांगलीला पाण्याची आवश्‍यकता असेल, त्यावेळी कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी शासनासमवेत चर्चा करत आहे.’’

Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
Loksabha Election : अजितदादांचा 'या' मतदारसंघावर दावा; 'महायुती'त मिठाचा खडा पडण्याची शक्यता, जागा वाटपावरून वाद

विसर्ग बंद करण्याचे पत्र कुणाच्या आदेशाने?

सातारा पालकमंत्री देसाई यांनी कोयनेतून विसर्ग बंद करण्याचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी, कोयना धरणातून सात तारखेपासून विसर्ग बंद करण्यात येत असल्याचे पत्र सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे, ते कुणाच्या आदेशाने, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com