स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी " या गावागावातून जाेरदार तयारी "

 Islampur ready for national success
Islampur ready for national success

इस्लामपूर (सांगली) : केंद्र व राज्याच्या शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राष्ट्रीय पातळीवर नववा क्रमांक मिळवल्यानंतर आघाडी घेण्यासाठी इस्लामपूर शहर सज्ज झाले आहे. पालिका प्रशासनाची त्यासाठी लगबग सुरू आहे. राजकीय घडामोडींमध्ये गुंतून पडलेले पदाधिकारी या नंतरच्या काळात अभियानात सक्रिय होतील. दरम्यान, पालिका प्रशासनाने अभियान निकषांच्या पूर्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. 

शहरात सार्वजनिक शौचालयांची देखभाल, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी वैयक्तिक, खासगी व स्वयंसेवी संस्था, संघटनांचा पुढाकार, सिंगल युज प्लास्टीक बंदी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, ओला व सुक्‍या कचऱ्याचे संकलन व वर्गीकरण, कंपोस्ट खताची निर्मिती या व अनुषंगिक गोष्टींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले आहे.

तक्रारींसाठी स्वच्छता ॲप स्वतंत्र यंत्रणा

बाजारपेठेच्या ठिकाणी ५० ते १०० मीटर अंतरावर कचरा संकलनाची व्यवस्था केली आहे. विविध प्रकाराच्या तक्रारींसाठी नागरिकांनी स्वच्छता ॲप वापरून त्यावर तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले आहे. तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे.

गावात सर्व  ठिकाणी शौचालयाची सुविधा

शौचालयांची दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्याचे प्रयत्न आहेत. शहराला हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर त्या पुढचा टप्पा म्हणून सर्व सुविधांनीयुक्त शौचालये असावीत यासाठीचाही दर्जा मिळाला आहे. त्याअंतर्गत बाजारमाण व वाकोबा देवालय परिसरातील शौचालये तयार केली आहेत.   

कचऱ्यातून प्लास्टीकपासून पेव्हर ब्लॉक

ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्याचा आठ टन क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित आहे. कचऱ्यातून जणाऱ्या प्लास्टीकपासून पेव्हर ब्लॉक करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प शहरात राबवला जात आहे. त्याची दखल शासनाने घेतली आहे. त्याच प्लास्टीकचा वापर झाडांना संरक्षण कुंपण म्हणून देखील करण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू आहे.

कचरा वेचक महिलांना या कामाचा आधार

सुक्‍या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या ५० टक्के कचऱ्याची पुनर्विक्री होताना दिसत आहे. कचरा वेचक महिलांना हे एक उपजीविकेचे साधन बनले आहे. २० ते २५ महिला दिवसाकाठी हा कचरा गोळा करून यातील निम्मे प्लास्टीक वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगात आणत आहेत.

कचऱ्याचा वापर भरावासाठी

इतर कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. ज्या कचऱ्यावर काहीच परिणाम होत नाही, अशाही कचऱ्याचा वापर भरावासाठी केला जात आहे. रस्त्यात व इतरत्र पडलेले बांधकामाचे साहित्य शहर सौंदर्यीकरणात अडथळा ठरत असल्याने ते उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हे साहित्य तिरंगा चौकात एकत्र केले जात आहे. 

मैला प्रक्रियेसाठी २२ लाख

मैला प्रक्रिया केंद्रासाठी शासनाकडून २२ लाख रुपयांच्या अनुदानाला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

स्वच्छतेबाबत  काेणतीही तक्रार ॲपद्वारे कऴवा 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नागरिकांचा फीडबॅक महत्त्वाचा आहे. स्वच्छतेच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारी असल्यास नागरिकांनी प्रत्यक्ष किंवा ॲपद्वारे पालिकेला तक्रारी द्याव्यात. प्लास्टीकचा वापर टाळावा. ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण स्वतंत्र करावे.
- प्रज्ञा पवार-पोतदार, मुख्याधिकारी 

नागरिकांचा  सक्रिय सहभाग महत्वाचा 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत पालिकेकडून सुरू असलेल्या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. शहर या अभियानात आघाडीवर राहील ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
-नगराध्यक्ष निशिकांत पाटील 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com