सांगलीत नागरी वस्तीमुळे मोरांची आश्रयस्थाने धोक्‍यात

sangli Peacock Shelters News
sangli Peacock Shelters News

सांगली : वाढत्या नागरीकरणामुळे सांगली परिसरातील मोरांच्या पारंपरिक आश्रयस्थानांवर अतिक्रमणे होत आहेत. महापालिका क्षेत्रात शेतीचे मोठे क्षेत्र होते. ते आकसत गेले तसे या मोरांची संख्या कमी होत गेली. आता त्यांना शहराबाहेर जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आश्‍चर्य वाटेल पण आजही सांगली शहर परिसरातील मानवी वस्तीत-गर्दीतही हजारो मोरांचा अधिवास आहे. 

मोर-मोरपीस लहानपणाची आठवण 

 शाळकरी वयात पुस्तकात जपलेले मोर-मोरपीस नक्कीच आयुष्यभर लक्षात राहते. मोरपीस कुठेही दिसले तर सहसा कोणी पुढे जात नाही. बऱ्याचदा घरात शोपीस म्हणून मोर लावले जाते. काही मंडळी घरात पाली येऊ नयेत या श्रद्धेपोटी (अंध?) लावतात. मात्र हे मोर आता शहरातून हद्दपार होत आहेत.

मोरांच्या छायाचित्रणाची मोठी संधी

अनेक सांगलीकरांना माहीतही नसेल की सांगलीत आजही अगदी भर मानवी वस्तीत मोरांची वस्ती आहे. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, हरिपूर अंकली रस्ता, कुपवाड वृद्धाश्रम परिसर, जयसिंगपूर-उदगाव परिसर, वॉन्लेसवाडी, कुंभार मळा येथे आजही अनेक मोर निवांतपणे वावरताना दिसतात. सध्या थंडीत जस जसे या भागातील ऊस कापला जाईल तसे त्यांचे मुक्त दर्शन होते. मोरांच्या छायाचित्रणाचीही मोठी संधी या काळात मिळते. 

मोरांसोबतचे सहजीवन लोकांनी स्वीकारावे 

गेली दोन वर्षे मोरांचे छायाचित्रण करणारे पक्षिमित्र सर्वदमन कुलकर्णी यांनी काही निरीक्षणे 'सकाळ'शी बोलताना नोंदवली. ते म्हणाले, 'नागरी वस्तीमुळे मोरांची आश्रयस्थाने धोक्‍यात आली आहेत. मात्र मोरांसोबतचे सहजीवन लोकांनी स्वीकारले तर ते शहरातही टिकून राहू शकतील. मोरांचे निरीक्षण-फोटोग्राफी खूप आनंद देणारी आहे.

हिवाळ्यात मोर मुलांनी पाहिले पाहीजेत

साधारण 3 फूट ते 5 फुटांपर्यंतची पिसे आपण बघतो मात्र दोन पिसांमधली जागा भरून काढण्यासाठी एक छोटंसं मोरपीस तयार होत असते आणि ते तेवढ्या जागेपुरतच वाढते. अशी इंच ते चार पाच इंचाची मोरपिसेही माझ्या संग्रही आहेत. हिवाळ्यात मोराची पीस गळायला सुरवात होते. ते पावसाळ्यापर्यंत परत त्याला पूर्ववत पीस येतात. या काळात मोरांचं जीवनचक्र जवळून पाहण्याची सर्वांना संधी असते. हे मोर मुलांनी पाहिले तर ते जपण्याची बुद्धी नव्या पिढीला होईल.' 


 सांगलीत मोर कुठे पहाल ? 

सांगलीत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, तात्यासाहेब मळा, हरिपूर अंकली रस्ता, कुपवाड वृद्धाश्रम परिसर, जयसिंगपूर-उदगाव परिसर, वॉन्लेसवाडी, कुंभार मळा येथे आजही अनेक मोर निवांतपणे वावरताना दिसतात. याशिवायही शहरात ठिकठिकाणी मोरांची आश्रयस्थाने आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com