
सांगली: मंत्रालयात कक्ष अधिकारी असून, अनेक मंत्र्यांच्या ओळखी असल्याचे सांगून सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची तब्बल ५ लाख ४९ हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी संशयित प्रवीण तानाजी राडे (वय ३५, मूळ रा. इस्लामपूर, ता. वाळवा, सध्या रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.