हृदयद्रावक ; कर्जाच्या त्रासाला कंटाळून कुटुंबाने एकत्रच संपवली जीवनयात्रा

अमृत वेताळ
Thursday, 28 January 2021

बुधवारी रात्री पती पत्नीने दोघा मुलासह आत्महत्या केली

बेळगाव : रायबाग तालुक्यातील भिरडी गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वे खाली झोकून देऊन आत्महत्या केली. बुधवार (ता. 27) रात्री रायबाग येथे ही घटना घडली आहे. 

सातप्पा अण्णाप्पा सुतार (वय 60), महादेवी सातप्पा सुतार (50), संतोष सातप्पा सुतार (26), दत्तात्रय सातप्पा सुतार (वय 28, सर्वजण रा. भिरडी ता. रायबाग) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री पती पत्नीने दोघा मुलासह आत्महत्या केली. वडिलांनी काढलेले कर्ज आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांनी जीवन संपविल्याचे समजते. घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात झाली असुन पुढील तपास सुरु आहे. 

हेही वाचा - अपघातात मायलेकरावर काळाचा घाला -

 

संपादन - स्नेहल कदम 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family attend suicide in belgaum because of loan tension in belgaum