
सांगली - हातावरचं त्यांचं पोट... चारचाकावरचा त्यांचा संसार... जडीबूटी विकूनच पोट भरणाऱ्या या दामप्त्याचे आज एका अपघाताने रोजीरोटीच हिरावून घेतली. चारचाकावरील त्यांचा संसार मोडला. येथील अंकली फाटा परिसरात रात्री आठच्या त्यांच्या चारचाकीला अचानक आग लागली आणि जडीबूटींसह संसारसाहित्य जळून खाक झाले. सांगलीसह जयसिंगपूर येथील अग्नीशमन दलाच्या बंबांनी आग नियंत्रणात आणली. तोवरच सारे काही जळून खाक झाले होते.