याबाबत नंदगड पोलिस ठाण्याला (Nandgad Police Station) माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
खानापूर : तालुक्यातील कारलगा येथील बियाण्याकरिता ठेवलेल्या उसाला आग लागल्याने शेतकऱ्याचा (Farmers) होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव तुकाराम रवळू पवार वय (७५) (रा. कारलगा) असे आहे.