esakal | शेतकरी दुहेरी कात्रीत ; ताकरी सुरू, तरीही मिळेना पाणी 

बोलून बातमी शोधा

Farmer double shears; Takari started, still no water}

ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन 12 दिवस झाले तरीही वांगी (ता. कडेगाव) परिसरातील बहुतांश पोटकालव्यांच्या टोकाला पाणीच पोहोचले नाही. आवर्तनाला उशीर आणि आता पाणीच पोहोचत नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. 

शेतकरी दुहेरी कात्रीत ; ताकरी सुरू, तरीही मिळेना पाणी 
sakal_logo
By
रवींद्र मोहिते

वांगी : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन 12 दिवस झाले तरीही वांगी (ता. कडेगाव) परिसरातील बहुतांश पोटकालव्यांच्या टोकाला पाणीच पोहोचले नाही. आवर्तनाला उशीर आणि आता पाणीच पोहोचत नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. 

मागील महिन्यात 20 फेब्रुवारीला ताकारी योजनेचे दुसरे आवर्तन सुरू होऊन पाणी मुख्य कालव्यातून वाहू लागले. या आवर्तनाला सव्वा महिना उशीर झाल्याने पाण्याचा खडखडाट होऊन उभी पिके करपली होती. जमिनीतील पाणीपातळीत खालावल्याने कालव्यातून पाणी पुढेच सरकत नव्हते. सध्या योजनेचे एकूण 8 पंप सुरू आहेत. यापैकी 3 पंपांचे पाणी टप्पा 3 मधून "सोनहिरा' खोऱ्यातील गावांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य कालव्यात केवळ 5 पंपांचेच पाणी वाहत आहे. सुरवातीपासून सर्व पोटकालव्यांची दारे खुली असल्याने कालव्यात पाण्याची उंची व दाब कमी आहे. 

कोणत्याही पोटकालव्यातून पुरेशा दाबाने पाणी वाहत नाही. त्यामुळे वांगी भागाला पाणी पुरविणाऱ्या वितरीका क्र.9,10,11,12,13 आणि 14 चे सिंचनक्षेत्र पूर्ण भिजलेले नाही. याच दाबाने पाणी राहिल्यास ते भिजणारही नाही. यापूर्वी योजनेचे एकूण 11 पंप सुरू केल्याशिवाय सर्व वितरिकांना भरपूर पाणी येत नसे. हा इतिहास अधिकाऱ्यांनी समजून घेऊन वितरणाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा तासगाव तालुक्‍यात पाणी पोहोचायला किमान दोन महिने लागतील. 

ताकारी योजनेचे आणखी 3 पंप आजपासून सुरू केले जाणार आहेत. जेणेकरून पाणी गतीने आणि आवश्‍यक दाबाने वितरिकातून वाहेल. व सर्व शेतकऱ्यांना लवकर पाणी मिळेल. सर्वांनी निश्‍चिंत रहावे. पाणी पुरेसे दिल्याशिवाय योजना बंद होणार नाही. 
- संजय पाटील, शाखाअभियंता (सिंचन), ताकारी योजना 


संपादन : प्रफुल्ल सुतार