
सांगली: ऊस गळीत हंगामासाठी कामगार पुरविण्याची बतावणी करून तुंग (ता. मिरज) येथील एका शेतकऱ्याची १० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम (तुंग) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित संदीप लक्ष्मण आडे (रिसोड, जि. वाशीम) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.