चव्हाण हे दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असतात. डाळिंबासह (Pomegranate) शेतीचे ज्ञानाचे भांडार त्यांच्याकडे आहे.
आटपाडी : विहिरीतील पाणी काढण्यासाठी मोटेपासून सुरू झालेला प्रवास इंजिन, पाण्याबाहेरील विद्युत पंप, पाण्यातील विद्युतपंप आणि तोही मोबाईलच्या साह्याने चालू करण्यापर्यंतचा यमाजी पाटलाचीवाडी येथील नारायण तातोबा चव्हाण-पाटील (Narayan Chavan-Patil) यांचा यशस्वी प्रवास आहे.